ETV Bharat / state

आज रात्री पुणे ग्रामीणचा लॉकडाऊन संपणार, पुन्हा लॉकडाऊन की अनलॉक याकडे सर्वांचे लक्ष - पुणे लेटेस्ट न्यूज

जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तालुक्यात 13 तारखेपासून पाचपेक्षा जास्त रुग्ण असणाऱ्या शहर व गावात लॉकडाऊन करण्यात आला होता. मात्र, आज (23 जुलै) रात्रीपासून लॉकडाऊनचा कालावधी संपणार आहे. पुढील लॉकडाऊनबाबात प्रशासनाकडून काय उपाययोजना केल्या जातात, याकडे पुण्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

period of lockdown in rural areas of Pune has end
आज रात्री पुणे ग्रामीणचा लॉकडाऊन संपणार
author img

By

Published : Jul 23, 2020, 4:43 PM IST

राजगुरुनगर (पुणे) - जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तालुक्यात 13 तारखेपासून पाचपेक्षा जास्त रुग्ण असणाऱ्या शहर व गावात लॉकडाऊन करण्यात आला होता. मात्र, आज (23 जुलै) रात्रीपासून लॉकडाऊनचा कालावधी संपणार आहे. पुढील लॉकडाऊनबाबत प्रशासनाकडून काय उपाययोजना केल्या जातात? याकडे पुण्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

period of lockdown in rural areas of Pune has end
आज रात्री पुणे ग्रामीणचा लॉकडाऊन संपणार

खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तालुक्यात गेल्या दिड महिन्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दहा दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला होता. या लॉकडाऊनला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला. मात्र, कोरोनाचा संसर्ग थांबला नसून त्यामध्ये अधिकच भर पडत आहे. त्यामुळे आजपासून संपणारे लॉकडाऊन पुन्हा सुरू होणार की नवीन नियमावली लागू करणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

कोरोनाचा समूह संसर्ग वाढत असल्याने प्रत्येक तालुक्यानुसार कोविड सेंटर उभारण्यात आले असून चाचण्यांच्या संख्येतही वाढ केली आहे. रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना योद्धाच कोरोनाग्रस्त...गेल्या चार महिन्यापासून दिवसरात्र एक करुन कोरोनाचा शिरकाव रोखण्यात प्रशासनाला यश आले होते. मात्र, मागील दिड महिन्यापासून कोरोनाने शिरकाव केल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातच पोलीस व महसूल विभागातील बड्या अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तरी प्रशासनाचा प्रत्येक कर्मचारी, आधिकारी दिवसरात्र मेहनत घेऊन काम करतोय. सध्या खेड तालुक्यात पोलीस निरिक्षक व प्रांताधिकारी यांना कोरोनाची लागण झाल्याने प्रशासनाची संपूर्ण जबाबदारी महिला आधिकारी तहसिलदार यांच्या खांद्यावर आहे. पुढील काळात प्रशासनाचा प्रत्येक आधिकारी व कर्मचारी काम करुन कोरोनाची साखळी रोखण्यात यशस्वी होईल, असा विश्वास तहसिलदार सुचित्रा आमले यांना व्यक्त केला.

लॉकडाऊनमुळे शेतकरी हतबल....गेल्या चार महिन्यापासून लॉकडाऊनच्या संकटात कष्टकरी बळीराजा अडकला आहे. शेतात मोठ्या भांडवली खर्चातून पिकवलेला शेतमाल बाजारपेठा, बाजारसमिती बंद असल्याने शेतातच सडून जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. त्याचबरोबर शेतीला पूरक असणारे जोडव्यवसायही संकटात सापडल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. छोटे मोठे उद्योगही बंद ...ग्रामीण भागातील तरुणवर्ग छोट्या मोठ्या उद्योगांमध्ये, बांधकामांवर मंजुरीने कामाला जात असतो. मात्र, सध्या लॉकडाऊनमुळे छोटे मोठे व्यवसाय बंद असल्याने मजुरांच्या हाताला काम नसल्याने मजुरवर्गही संकटात सापडला आहे. त्यातून मजुर अड्डेही ओस पडले आहेत. हाताला काम नसल्याने संसाराचा गाडा चालवायचा कसा, खायचे काय? असे अनेक प्रश्न मजुरांसमोर उभे आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.