पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहराची तहान भागविणारे पवना धरण हे 95 टक्के भरले असून पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास धरण लवकरच शंभर टक्के भरले जाईल. धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे. यामुळे पवना नदी काठावरील गावांनी सतर्क रहावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे उपअभियंता अशोक शेटे यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण 95 टक्के भरले असून गेल्या 24 तासात 3 6मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, धरण पाणलोट क्षेत्रात असाच पाऊस सुरू राहिल्यास लकवरच पवना धरण हे 100 टक्के भरेल, असा अंदाज पाटबंधारे विभागाचे उपअभियंता यांनी व्यक्त केले.अशोक शेटे म्हणाले, पवना धरण शंभर टक्के भरल्यानंतर लगेचच धरणाच्या सांडव्यावरुन पाणी नदी पात्रात साेडले जाणार आहे. तरी पवना नदी काठच्या सर्व नागरीकांनी सतर्क रहावे. नदी काठावरील सर्व साधनसामुग्री, वाहने व जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावे. जेणे करून कोणत्याही प्रकारचे नुकसान हाेणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
हेही वाचा - भिमा नदीवरील चासकमान धरण ओव्हरफ्लो; डाव्या कालव्यातुन विसर्ग सुरू