ETV Bharat / state

पुण्यात कार्डिअ‌ॅक रुग्णवाहिकांची कमतरता, रुग्णांचे जीव धोक्यात - Jumbo Covid Care Center

पुणे शहर आणि जिल्ह्यात एकूण ५०० ते ६०० रुग्णवाहिका आहेत. यात १०० रुग्णवाहिका पिंपरी-चिंचवड शहरात, ३०० पुणे शहरात तर, ५० ते १०० जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आहेत. यात कार्डिअ‌ॅक रुग्णवाहिका फक्त १० ते १५ आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून सरकारने जम्बो कोविड केअर सेंटर उभारले. पण त्या ठिकाणी एकही कार्डिअ‌ॅक रुग्णवाहिका नाही हे दुर्दैव आहे.

पुण्यात रुग्णवाहिकांची कमतरता
पुण्यात रुग्णवाहिकांची कमतरता
author img

By

Published : Sep 5, 2020, 6:35 PM IST

पुणे - कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णवाहिका आणि कार्डिअ‌ॅक रुग्णवाहिकांची मागणी अचानक वाढली आहे. त्या तुलनेत खासगी चालकांकडे कार्डिअ‌ॅक रुग्णवाहिका उपलब्ध नाहीत. तर, दुसरीकडे रुग्णवाहिका असूनही खासगी रुग्णालयांकडून त्या देण्यास नकार दिला जात आहे. यामुळे रुग्णांना वेळेवर कार्डिअ‌ॅक रुग्णवाहिका मिळत नसल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. कार्डिअ‌ॅक रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने पुण्यात रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत.

पुण्यात कार्डिअ‌ॅक रुग्णवाहिकांची कमतरता
जम्बो रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पत्रकार पांडुरंग रायकर आणि भारती रुग्णालयात उपचार घेणाऱ्या महिला रुग्णाला वेळेवर कार्डिअ‌ॅक रुग्णवाहिका न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. पुणे शहरात कार्डिअ‌ॅक रुग्णवाहिकांची संख्या कमी आहे. त्याचा खर्च अधिक आहे. त्यावर स्वतंत्र डॉक्टरची आवश्यकता असते. शहरात सध्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, पूना हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल तसेच ओएनपी रुग्णालयांकडे कार्डिअ‌ॅक रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. मात्र, गरजेच्या वेळी रुग्णालयांकडून अशा रुग्णवाहिका देण्यास नकार दिला जात असल्याने रुग्णांचा मृत्यू होण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी रुग्णवाहिकाचालकांकडे ४०० ते ५०० रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. त्यापैकी १० ते १५ कार्डिअ‌ॅक रुग्णवाहिका आहेत. कार्डिअ‌ॅक रुग्णवाहिकेत डॉक्टरांसह औषधे, ईसीजी, व्हेंटिलेटर, सीरिज पंप यांसारख्या सुविधा असतात. खासगी रुग्णवाहिका चालकांना हा खर्च परवडत नाही. तसेच, डॉक्टर उपलब्ध होत नाहीत. पूर्वी हृदयविकाराच्या घटना मोजक्याच व्हायच्या. त्यामुळे १० ते १५ रुग्णवाहिका पुरेशा असायच्या. परंतु कोरोनामुळे या रुग्णवाहिकांची मागणी वाढली. तेवढ्या प्रमाणात आता रुग्णवाहिका नाहीत. रोजच कार्डिअ‌ॅक रुग्णवाहिकांची मागणी आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात एकूण ५०० ते ६०० रुग्णवाहिका आहेत. यात १०० रुग्णवाहिका पिंपरी-चिंचवड शहरात, ३०० पुणे शहरात तर, ५० ते १०० जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आहेत. यात कार्डिअ‌ॅक रुग्णवाहिका फक्त १० ते १५ आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून सरकारने जम्बो कोविड केअर सेंटर उभारले. पण त्या ठिकाणी एकही कार्डिअ‌ॅक रुग्णवाहिका नाही हे दुर्दैव आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.