पिंपरी-चिंचवड - शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटर बॉम्बवर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रताप सरनाईक यांच्या भूमिकेचे मी स्वागत करते असं यावेळी मुंडे यांनी म्हटले आहे. त्या पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, भाजपा आणि शिवसेनेची अनेक वर्षांपासून युती राहिलेली आहे. युतीमुळे अनेकांना संधी मिळाली. त्यामुळे प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना असं पत्र लिहिणे साहाजिक आहे. प्रताप सरनाईक यांच्या भूमिकेचे मी स्वागत करते, भविष्यातील निर्णय त्या-त्यावेळी घेतले जातील.
शिवसेना आणि भाजप युतीवर बोलणे घाईचे - पंकजा मुंडे
दरम्यान, मुख्यमंत्री आणि माझं वैयक्तिक नातं वेगळं आहे. मात्र तरी देखील मी माझ्या पक्षाच्या भूमिकेवर ठाम राहाते. या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे भविष्यात काय होणार हे आता नाही सांगता येत. शिवसेना आणि भाजप युतीबाबत आता भाकीत करणे घाईचे होईल असेही यावेळी पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - आंतरराष्ट्रीय योग दिन : असे असणार कार्यक्रमाचे स्वरुप