पुणे - राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पुण्यात आणखी एका रुग्णाचा कोरोनाच्या तपासणीचा अहवाल हा पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही १६ वर पोहोचली आहे. ही व्यक्ती पिंपरी चिंचवड भागातील रहिवासी असून ती जपानला जाऊन आली होती. ज्याची १४ मार्चला चाचणी करण्यात आली होती. त्याचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. तर, राज्यभरात कोरोणाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३२ झाली आहे.
-
#coronavirus राज्यात पिंपरी चिंचवड मनपा - ८ रूग्ण, पुणे - ७, मुंबई - ५, नागपूर - ४, यवतमाळ - २, रायगड, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, औरंगाबाद, अहमदनगर प्रत्येकी एक असे एकूण ३२ रूग्ण आहेत. #CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#coronavirus राज्यात पिंपरी चिंचवड मनपा - ८ रूग्ण, पुणे - ७, मुंबई - ५, नागपूर - ४, यवतमाळ - २, रायगड, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, औरंगाबाद, अहमदनगर प्रत्येकी एक असे एकूण ३२ रूग्ण आहेत. #CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 15, 2020#coronavirus राज्यात पिंपरी चिंचवड मनपा - ८ रूग्ण, पुणे - ७, मुंबई - ५, नागपूर - ४, यवतमाळ - २, रायगड, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, औरंगाबाद, अहमदनगर प्रत्येकी एक असे एकूण ३२ रूग्ण आहेत. #CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 15, 2020
राज्यात १३ मार्च २०२० पासून साथरोग अधिनियम कायदा १८९७ लागू करण्यात आला असून त्यानुसार या अधिनियमाच्या खंड २, ३ व ४ नुसार महाराष्ट्र कोव्हीड १९ उपाययोजना नियम २०२० ही अधिसूचना निर्गमित करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. तसेच, राज्यात साथरोग अधिनियमानुसार कोविड १९ उद्रेक प्रतिबंध व नियंत्रणासाठी आयुक्त, आरोग्य सेवा,संचालक आरोग्य सेवा, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त हे सक्षम अधिकारी म्हणून घोषीत करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
-
#coronavirus कोविड १९ या आजारासंदर्भात चुकीची माहिती अथवा अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींविरुध्द अथवा प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजना अंमलबाजावणीमध्ये अडथळा आणणाऱ्या व्यक्तीविरुध्द कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकारही या अधिसूचनेनुसार सक्षम अधिकाऱ्याला प्रदान करण्यात आले आहेत.
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#coronavirus कोविड १९ या आजारासंदर्भात चुकीची माहिती अथवा अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींविरुध्द अथवा प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजना अंमलबाजावणीमध्ये अडथळा आणणाऱ्या व्यक्तीविरुध्द कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकारही या अधिसूचनेनुसार सक्षम अधिकाऱ्याला प्रदान करण्यात आले आहेत.
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 15, 2020#coronavirus कोविड १९ या आजारासंदर्भात चुकीची माहिती अथवा अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींविरुध्द अथवा प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजना अंमलबाजावणीमध्ये अडथळा आणणाऱ्या व्यक्तीविरुध्द कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकारही या अधिसूचनेनुसार सक्षम अधिकाऱ्याला प्रदान करण्यात आले आहेत.
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 15, 2020
यासोबतच कोरोणा विषाणूबाबत तसेच रुग्णांबाबत समाज माध्यमांतून खोटी माहिती, अफवा पसरवली जात आहे. त्यामुळे नागिरकांमध्ये भीतीचे वातावरण वाढले आहे. आरोग्य विभागामार्फत यासंबंधी विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत असून सोशल मीडियावर कोरोनासंबंधी फिरणारे खोटे संदेश, अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती त्यांनी ट्वीटरवरुन दिली.
हेही वाचा - मुंबईतील बनावट सॅनिटायझरचा कारखाना उद्ध्वस्त; दोघांना अटक