ETV Bharat / state

केंद्र सरकारच्या धोरणांना विरोध; 24 जानेवारीला वंचित आघाडीकडून 'महाराष्ट्र बंद'ची हाक

देशात अराजकता माजेल अशी स्थिती आहे. या परिस्थितीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भारतीय जनता पक्ष कारणीभूत आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. म्हणून केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात 24 जानेवारीला राज्यात बंद पुकारण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

prakash ambedkar (president, vanchit bahujan aaghadi)
प्रकाश आंबेडकर (संस्थापक, वंचित बहुजन आघाडी)
author img

By

Published : Jan 18, 2020, 7:54 PM IST

पुणे - देशात अराजकता माजेल अशी स्थिती आहे. या परिस्थितीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भारतीय जनता पक्ष कारणीभूत आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. म्हणून केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात 24 जानेवारीला राज्यात बंद पुकारण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. शहरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

प्रकाश आंबेडकर (संस्थापक, वंचित बहुजन आघाडी)

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, सध्या देशात लोकशाही नाही तर हिटलरशाही दिसत आहे. नागरिकत्व दुरूस्ती कायद्यासंदर्भात येत असलेल्या बातम्यांमधून हा दहशतवाद निर्माण झाला आहे. राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी), नागरिकत्व दुरूस्ती विधेयक (सीएए) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीच्या (एनपीआर) माध्यमातून असंवैधानिक आणि आरएसएसला अपेक्षित काम सरकारकडून सुरू आहे.

हेही वाचा - 'देशातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता समुपदेशन करण्याची गरज'

सध्या देशाची अर्थव्यवस्था ठप्प आहे. देश चालवण्यासाठी सरकारकडे पैसा नाही. 3 लक्ष कोटींची तूट आहे. हे सरकार दारुड्यासारखे सरकार आहे. केंद्र सरकारकडून एक-एक गोष्ट विकायला काढण्यात आली आहे, अशी टीका करत 9 हजार कोटींची नफा देणारी भारत पेट्रोलियम कंपनीला सरकारने विकायला काढली. याप्रकारे सरकार सोन्याचे अंड देणारी कोंबडी कापायला निघाले आहे. म्हणून या सगळ्या विरोधात येत्या 24 जानेवारीला 'महाराष्ट्र बंद' पुकारण्यात आला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

स्मारकाचा निधी वाडियाला वर्ग करा-

पुढे बोलताना ते म्हणाले, पुतळ्याची उंची वाढवायला सरकारकडे पैसा आहे. मात्र, वाडिया हॉस्पिटलसाठी नाही. न्यायालयाच्या भूमिकेचे स्वागत करतो, असेही ते म्हणाले. तसेच इंदूमिलमध्ये डॉ. बाबासाहेबांचे स्मारक वादात आहे. तिथे पुतळा उभारण्याऐवजी एक बौध्दिक विचार केंद्र निर्माण व्हावे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच तिथे पुतळा उभारण्यासाठी जो निधी मंजूर करण्यात आला आहे तो वाडिया रुग्णालयासाठी वर्ग करावा, पुतळा नंतर उभारता येईल, अशी विनंतीही त्यांनी केली.

हेही वाचा - 'आधी केले मग सांगितले'... अशोक चव्हाणांनी स्वतः हटवले अनधिकृत बॅनर

मुंबई नाईट लाईफ संदर्भात त्यांनी नाईटलाईफचे समर्थन केले आहे. दिवसभर काम करणाऱ्या माणसाला रात्री सोशल लाईफ जगण्याची संधी पाहिजे. मी स्वतः नाईट लाईफ जगलो आहे. त्यामुळे ज्याठिकाणी गरज आहे, त्याठिकाणी नाईट लाईफ पाहिजे, असे ते म्हणाले.

Intro:केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात 24 जानेवारीला वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्र बंद ची हाकBody:mh_pun_02_prakash_ambedkar_avb_7201348

anchor
देशात घातक परिस्थिती आहे.
अराजक माजेल अशी स्थिती आहे.
त्याला आर एस एस आणि भाजप कारणीभूत आहे, सध्या तर
देशात लोकशाही दिसत नाही, हिटलर शाही दिसते अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे...NRC संदर्भात येत असलेल्या बातम्यांमधून हा दशतवाद निर्माण झालाय. NRC, CAA आणि NPR च्या माध्यमातून असंविधनिक आणि आर एस एस ला अपेक्षित काम सरकारकडून सुरू आहे सध्या देशाची अर्थव्यवस्था ठप्प आहे देश चालवण्यासाठी पैसा नाही
3 लक्ष कोटीची तूट आहे
हे सरकार दारुड्यासारखे सरकार आहे, त्यानं एक एक गोष्ट विकायला काढलीय अशी टीका करत 9 हजार कोटींची नफा देणारी भारत पेट्रोलियम या सरकारने विकायला काढली आहे त्यामुळे सरकार सोन्याच अंड देणारी कोंबडी कापायला निघाले आहे.. या सगळ्या विरोधात 24 जानेवारी ला महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले... पुतळ्याची उंची वाढवायला पैसा आहे आणि वाडिया हॉस्पिटलला नाही या न्यायालयाच्या भूमिकेचं स्वागत करतो असे आंबेडकर म्हणाले
इंदुमिल मध्ये बाबासाहेबांचं स्मारक वादात आहे. तिथे पुतळा उभारण्याऐवजी एक बौध्दीक विचार केंद्र निर्माण व्हावं अस माझं मत असल्याचे सांगत
तिथे पुतळा उभारण्यासाठी जो निधी मंजूर केलाय तो वाडिया साठी वर्ग करावा अशी माझी कोर्टाला विनंती आहे. पुतळा नंतर उभारता येऊ शकतो असे प्रकाश आंबेडकर म्हणाले... मुंबई नाईट लाईफ संदर्भात बोलताना मी नाईट लाईफ च्या बाजूने आहे दिवसभर काम करणाऱ्या माणसाला रात्री सोशल लाइफ जगण्याची संधी पाहिजे मी स्वतः नाईट लाईफ जगलोय त्यामुळे जिथे जिथे गरज आहे तिथे नाईट लाईफ पाहिजे मी त्याचे समर्थन करतो असे आंबेडकर म्हणाले
Byte प्रकाश आंबडकर, नेते वंचित बहुजन आघाडीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.