पिंपरी-चिंचवड (पुणे) - पिंपरी-चिंचवड शहरातील जम्बो कोविड सेंटरमधून 32 परिचारिकांना तडकाफडकी काढून टाकण्यात आले होते. तसेच त्यांना जेमतेम पगार देण्यात आला होता. या प्रकरणी मसनेच्या कार्यकर्त्यांनी कोविड सेंटरवर जाऊन मनसे स्टाईल आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर चार दिवसात संपूर्ण पगार देऊ, असे आश्वासन ठेकेदाराकडून देण्यात आले. मात्र आठवडाभरानंतर आज ठरल्याप्रमाणे पगार न देता प्रत्येकी दहा हजार रुपये कमी देण्यात आल्याने परिचरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
जम्बो कोविड सेंटरमधून काढण्यात आलेल्या 'त्या' परिचरिकांचा अखेर पगार झाला!
पिंपरी-चिंचवड शहरातील जम्बो कोविड सेंटरमधून तडकाफडकी नोकरीवरून काढून टाकण्यात आलेल्या 32 परिचरिकांना मनसेच्या आंदोलनानंतर वेतन देण्यात आले. मात्र ठरल्याप्रमाणे न देता प्रत्येकी १० हजार रुपये कमी दिले.