ETV Bharat / state

...तोपर्यंत राज्यातील एकही महाविद्यालय सुरू होणार नाही - उदय सामंत

राज्यातील कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या जोपर्यंत आटोक्यात येत नाही, तोपर्यंत एकही महाविद्यालय सुरू होणार नाही, अशी भूमिका राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडली.

उदय सामंत
उदय सामंत
author img

By

Published : Oct 6, 2020, 2:53 PM IST

पुणे - राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत नाही तोपर्यंत, एकही महाविद्यालय सुरू होणार नाही, अशी भूमिका राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडली.

आगामी काही दिवसांतच महाराष्ट्रात दोन लाख विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा पार पडणार आहे. त्यासंदर्भात उदय सामंत यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कुलगुरू आणि प्राध्यापकांची बैठक घेत तयारीचा आढावा घेतला. उदय सामंत म्हणाले, राज्यात सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. टप्प्याटप्प्याने अनेक गोष्टी सुरू झाल्या आहेत. राज्यातील अडीच लाख विद्यार्थी परीक्षा देणार असून त्यातील दोन लाख ऑनलाइन तर, उर्वरित पन्नास हजार ऑफलाइन पद्धतीने अंतिम वर्षाच्या परीक्षा देणार आहेत. या परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाची मदत घेण्यात येणार आहे. याशिवाय राज्य शासनाने कोविड-१९ पार्श्वभूमीवर घालून देण्यात आलेल्या निकषांचेही काटेकोरपणे पालन केले जाणार आहे.

उदय सामंत म्हणाले, राज्य सरकारने 4 मे रोजी प्रसिद्ध केलेला शासकीय पदभरती बंदीचा निर्णय प्राध्यापक भरतीसाठी स्थगित केला जाणार आहे. याशिवाय राज्यातील प्राध्यापकांच्या रिक्त जागेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली असून लवकरच या जागांची भरती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - पुण्यातील साऊंड सर्व्हिससह इतर सेवा पुरवणाऱ्यांचा बुधवारी मूकमोर्चा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.