ETV Bharat / state

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत मंत्रपठण; राष्ट्रवादीच्या विरोधी पक्षनेत्याने खुर्चीवर विराजमान होण्यापूर्वी घातली पूजा - राष्ट्रवादी विरोधी पक्ष नेत्याची दालनात पूजा

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगर सेवक राजू मिसाळ यांची निवड झाली. मात्र, नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते मिसाळ यांनी मंत्र पठण आणि धार्मिक पूजा करून खुर्चीवर विराजमान होण्यात धन्यता मानली.

corporators offering pooja
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत मंत्रपठण
author img

By

Published : Sep 10, 2020, 7:20 AM IST

Updated : Sep 10, 2020, 8:00 AM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या विरोधी पक्षनेते पदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगर सेवक राजू मिसाळ यांची निवड झाली. त्यानंतर महानगर पालिकेत विरोधी पक्षनेते मात्र, कक्षात धार्मिक पूजा करत मंत्र तंत्र करून खुर्चीवर विराजमान झाले आहेत. एकीकडे शासकीय कार्यालयात धार्मिक पूजा किंवा तंत्र मंत्र करण्यास मज्जाव आहे. तरीही राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी शासनाचा नियम डावलून मंत्र पठण आणि धार्मिक पूजा करून खुर्चीवर विराजमान होण्याचा सोपस्कार पार पाडला. त्यामुळे त्यांच्यावर पक्षश्रेष्ठीकडून काही कारवाई होणार का हे पाहावे लागणार आहे.

माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांचा विरोधी पक्ष नेते पदाचा एक वर्षाचा (पक्षाने ठरवून दिलेल्या) कार्यकाळ संपल्याने कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष होते. दरम्यान, अनेकांनी आपापल्या पद्धतीने फिल्डींग लावली असताना पार्थ पवार यांचे निकटवर्तीय असलेले राजू मिसाळ यांची विरोधी पक्षनेते पदी वर्णी लागली. मावळ लोकसभा दरम्यान मिसाळ हे सावली प्रमाणे पार्थ पवार यांच्या सोबत होते.

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत मंत्रपठण
शासनाने असा आदेश दिलेला आहे की, शासकीय कार्यलयात धार्मिक पूजा, मंत्र तंत्र करू नये. पिंपरी-चिंचवड महानगर पालिका ही शासकीय कार्यलय आहे. त्यामध्ये मंत्र-तंत्र करून पूजा करणे अपेक्षित नव्हते. मिसाळ यांनी ते केले आहे. हे पाहता चुकीच असल्याचं बोललं जातं आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास महानगर पालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयातून अचानक मंत्र पठणाचे मोठं मोठ्याने आवाज येत होते. भटजी उपस्थित होते, त्यानंतर मंत्र पठण होत असताना नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांना टीळा लावण्यात आला आणि राजू मिसाळ हे खुर्चीवर विराजमान झाले.

गणपती बाप्पांचा जयघोष करण्यात आला. राजू मिसाळ यांचे औक्षण करण्यात आले. भटजींनी पुन्हा मंत्र पठण करत मिसाळ यांच्यावर अक्षदा टाकल्या. हे सर्व पाहता नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते वादाच्या भोवऱ्यात सापडले असून त्यांच्यावर पक्षश्रेष्ठी काही कारवाई करते का हे पाहावे लागेल.

Last Updated : Sep 10, 2020, 8:00 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.