पुणे: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका बावीस वर्षीय तरुणाचे एका तरुणीवर प्रेम होते. ही तरुणी एका ठिकाणी काम करत होती. त्या ठिकाणी काम करणाऱ्या मॅनेजर सोबत तिचा अफेअर सुरू असल्याचा संशय प्रियकराला होता. त्यामुळे प्रियकर या तरुणीचा पाठलाग करत होता. दरम्यान शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास संबंधित मॅनेजरने या तरुणीला लोकमान्यनगर येथे दुचाकीवरून सोडले.
त्यानंतर प्रियकराने त्या मॅनेजरचा पाठलाग करत तुझे आणि तिचे काय सुरू आहे अशी विचारणा केली. त्याचा हा गैरसमज दूर करण्यासाठी मॅनेजर ती तरुणी आमच्या दोघात चुकीचे काहीही नाही असे त्या प्रियकराला सांगण्याचा प्रयत्न करत होते. परंतु प्रियकर तरुण मात्र काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याच्यात आणि संबंधित मॅनेजर मध्ये वादावादी सुरू होती. त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या तरुणीने तीच्या मामांना फोन करुन बोलावले.
तीचे मामा चार पाच साथीदारांसह तीथे पोचले आणि मामाने थेट तलवार काढली त्या प्रियकरावर हल्ला होईल या भीतीने त्याचा एक मीत्र मधे पडला. त्यात त्याच्या मानेवर तलवारीचा घाव लागला यात तो गंभीर जखमी झाला त्याचा जागीच मृत्यू झाला.या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambag Police Thane ) सुमारे सहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे्ही वाचा : Pune Crime : पुण्यातील सिंहगड कॉलेजमध्ये गुंडांचा राडा; विद्यार्थ्याला बेदम मारहाण