ETV Bharat / state

Swati Mohal joined BJP: मोहोळ गँगचा गुंड शरद मोहोळच्या पत्नीचा भाजपात प्रवेश; पक्षप्रवेशाला चंद्रकांत पाटील उपस्थित - Swati Mohal

पुण्यातील मोहळ गँग प्रमूख शरद मोहोळ यांच्या पत्नी स्वाती मोहळ यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्या स्वारद प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुण्यातील कोथरूड भागामध्ये सामजिक काम करतात. एकेकाळी पुण्यामध्ये मोठी दहशत असणारी ही मोहोळ गँग आहे. गुंड आणि राजकारणी यांचा संगम सर्वच ठिकाणी दिसून येत आहे.

Swati Mohal joined BJP
स्वाती मोहळचा भाजपात प्रवेश
author img

By

Published : Apr 21, 2023, 9:47 AM IST

स्वाती मोहळचा भाजपात प्रवेश

पुणे : भाजपा नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्वाती मोहळचा भाजपात प्रवेश झाल्याने पुण्यात मोठी चर्चा होत आहे. स्वतः या पक्षप्रवेशाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. त्यांच्याच प्रमुख मार्गदर्शनाखाली हा प्रवेश झाल्याने पुण्यातील सगळ्या लोकांचा भुवया उंचावल्या आहेत. गेल्या काही दिवसापासून भाजपामध्ये पुण्यातील अनेक गुन्हेगारांचा प्रवेश होत आहे. कसबा पोट निवडणुकीमध्ये शरद मोहोळ भाजप प्रचारात दिसला होता. भाजपा राजकारणाचे गुन्हेगारीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका सुद्धा विरोधक करत आहे.

हिंदुत्ववादी मतदानाची अपेक्षा : पुण्यात काही दिवसापूर्वी हिंदू आक्रोश मोर्चा निघाला होता. त्या हिंदू आक्रोश मोर्चाचे नेतृत्व शरद मोहोळ यांनी केले होते. त्यावेळी त्यांनी भाजपात येण्याची कुठलीही इच्छा, राजकीय आकांक्षा नाही, असे म्हटले होते. परंतु भाजपाने हिंदुत्ववादी मतदान होईल, आपल्याला या येणाऱ्या निवडणुकीत फायदा होईल. त्या दृष्टीने हा प्रवेश करून घेतलेला आहे. नुकतेच गिरीश बापट यांचे निधन झाल्याने पुण्याची लोकसभा सुद्धा आता लढावी लागणार आहे. त्यावेळी पराभव होऊ नये, यासाठी ही काळजी घेतली असल्याचे भाजपकडून बोलले जात आहे.

गुन्हेगाराच्या पत्नीला प्रवेश : दोन वर्षांपूर्वी स्वाती मोहोळ यांनी चंद्रकांत पाटील यांचा एका कार्यक्रमात सत्कार केला होता. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी गुंड आहे का? मला माहिती नाही, असे म्हणून हात झटकले होते. परंतु आता मात्र त्यांनी दणदणीत प्रवेश करून घेतलेला आहे. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी हात झटकणारे चंद्रकांत पाटील अचानक प्रवेशास कसे तयार झाले? याची चर्चा आता पुण्यात होत आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा एका गुन्हेगाराच्या पत्नीला प्रवेश दिल्याने भाजपावर टीका होत आहे.

काम प्रामाणिकपणे करणार : चंद्रकांत पाटील म्हणाले की, स्वाती मोहोळ यांचे हिंदू आक्रोश मोर्चा, कोथरूड भागातील संघटन चांगले असल्याने त्यांचा पक्षाला फायदा होईल. पक्षही त्याचा योग्य सन्मान करेल, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. स्वाती मोहोळ यांनी पक्षातील जबाबदारीतील काम प्रामाणिकपणे करणार असल्याचे म्हटलेले आहे. पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. या पक्षप्रवेशावर स्वतः पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि स्वाती मोहोळ या दोघांनीही माध्यमातून प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

भाजपावर टीका : एकेकाळी पुण्यात दहशत असणाऱ्या मोहोळ गॅंगचे सगळे काम शरद मोहोळ काम करत असल्याचे बोलले जाते. शरद मोहोळ यांनी अनेक वेळा तुरुंग वारीसुद्धा केली आहे. येरवडा कारागृहामध्ये एका मुस्लिम देशद्रोही व्यक्तीला शरद मोहोळने मारले होते. तेव्हापासून त्याची हिंदुत्ववादी अशी ओळख निर्माण झाली. याचाच फायदा भाजपाने घेण्यासाठी त्यांच्या घरच्यांना प्रवेश दिला आहे. अनेक वेळा तडीपारमध्ये त्याने तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळे एवढी मोठी गुंड गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीच्या घरातील व्यक्तीला प्रवेश दिला आहे. त्यामुळे आता सर्वत्र भाजपावर टीका होत आहे.

हेही वाचा : Sanjay Balgude Letter : दादा पुणेकरांना वाचवा; काँग्रेस प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे यांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.