पुणे (पिंपरी) - पिंपरी-चिंचवड परिसरात महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. यापैकी एक जण अल्पवयीन मुलगा आहे. त्यांच्याकडून 1 लाख 4 हजारांचे 15 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. मार्शल सबेस्टीन उर्फ मुकुल डीसोजा अस अटक करण्यात आरोपीचे नाव आहे.
मोबाईलचे लॉक तोडण्यासाठी आले असता केली अटक-
सांगवी पोलिसांनी मोबाईल चोरट्यांना अटक केली आहे. आरोपी मोबाईलचे लॉक तोडण्यासाठी सांगवीच्या कृष्णा चौकात येणार आहेत. अशी माहिती, पोलीस कर्मचारी कैलास केंगले, विजय मोरे, अरुण नरळे आणि प्रवीण पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंके यांच्या पथकाने सापळा रचून दोन जणांना ताब्यात घेतले.
अल्पवयीन मुलगा ताब्यात-
यापैकी, एक आरोपी अल्पवयीन आहे. आरोपी मार्शलकडे अधिक चौकशी केली असता त्याने सांगवी पोलीस ठाण्याच्या परिसरात तीन मोबाईल चोरले असल्याची कबुली दिली. तसेच, 12 मोबाईल त्याच्याकडे मिळून आले. एकूण 15 मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ आनंद भोईटे, सहायक पोलीस आयुक्त वाकड विभाग गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले, तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक यशवंत साळुके, पोलीस हवालदार चंद्रकांत भिसे, पोलीस नाईक कैलास केंगले, सुरेश भोजणे, रोहिदास बोऱ्हाडे, पोलीस शिपाई अरुण नरळे, विजय मोरे, प्रविण पाटील, शशीकांत देवकांत, नितीन खोपकर, अनिल देवकर, हेमंतकुमार गुत्तीकोंडा, दिपक पिसे, शिमोन चांदेकर यांच्या पथकाने केली आहे.
हेही वाचा- नाशिक : डेटिंग अॅपवरून महिला असल्याचे भासवून ऑनलाइन फसवणूक, व्यापाऱ्याला 19 लाखांना चुना
हेही वाचा- संविधानामुळेच २१व्या शतकात भारत करत आहे प्रगती - देवेंद्र फडणवीस