ETV Bharat / state

आजपासून 'मित्र शक्ती 2023 सराव' पुण्यातल्या औंध येथे सुरू - India Srilanka Mitra Shakti

Mitra Shakti 2023 Practice : 'मित्र शक्ती-2023 सराव' या नवव्या भारत-श्रीलंका संयुक्त लष्करी सरावाला (India Sri lanka Mitra Shakti) आज पुण्यातील औंध येथे सुरुवात झाली. हा सराव 16 ते 29 नोव्हेंबर 2023 या कालावधीत होणार आहे.

Mitra Shakti 2023 Practice
मित्र शक्ती 2023 सराव
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 16, 2023, 9:57 PM IST

Updated : Nov 16, 2023, 10:54 PM IST

पुणे Mitra Shakti 2023 Practice : 120 जवानांच्या भारतीय पथकाचे प्रतिनिधित्व प्रामुख्याने मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटच्या तुकड्या करत आहेत. श्रीलंकेचे प्रतिनिधित्व 53 पायदळ तुकडीचे जवान करत (India Sri lanka Mitra Shakti) आहेत. या सरावात भारतीय हवाई दलाचे 15 आणि श्रीलंकन (Sri lanka) हवाई दलाचे पाच जवान सहभागी होत आहेत.

असा असणार सराव : संयुक्त राष्ट्र सनद अध्याय VII अंतर्गत उप-पारंपरिक मोहिमेचा संयुक्तपणे सराव करणं हा या सरावाचा उद्देश आहे. या सरावात, दहशतवादविरोधी कारवायांमध्ये एकत्रितपणे समन्वयीत प्रतिसादांचा समावेश आहे. दोन्ही देश छापा घालणं, शोधमोहीम आणि शत्रूच्या कारवाया हाणून पाडणं, हेलिकॉप्टरद्वारे राबवण्यात येणाऱ्या मोहिमा, इत्यादी रणनीतिक कृतीचा सराव करतील.

मालमत्ता हानीचा धोका कमी करण्याचे उद्दिष्ट : 'मित्र शक्ती 2023' या सरावामध्ये हेलिकॉप्टर व्यतिरिक्त ड्रोन आणि प्रतिबंध करण्यासाठीच्या मानवरहित हवाई यंत्रणांचाही समावेश असेल. हेलिपॅड सुरक्षित करण्यासाठी आणि दहशतवादविरोधी कारवायांमधील पीडितांना बाहेर काढण्यासाठीचा सराव देखील दोन्ही बाजूंनी संयुक्तपणे केला जाईल. शांतता मोहीमे दरम्यान संयुक्त राष्ट्राचे हित आणि अजेंडा अग्रस्थानी ठेवून सैन्यांमधील परस्पर कार्यक्षमतेची पातळी वाढवण्यासाठी आणि जीवितहानी आणि मालमत्ता हानीचा धोका कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांवर भर दिला जाईल.

राष्ट्रांमधील संबंध होणार दृढ : दोन्ही देश युद्ध कौशल्यांच्या विस्तृत कार्यक्षेत्रात संयुक्त दृष्टीकोनाची आणि सरावांची देवाणघेवाण करतील, ज्यामुळं सहभागींना परस्परांकडून शिकण्यास मदत होईल. सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण केल्यानं भारतीय लष्कर आणि श्रीलंकेचं लष्कर यांच्यातील संरक्षण सहकार्याची पातळी आणखी वाढेल. या सरावामुळे दोन्ही शेजारी राष्ट्रांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील.

हेही वाचा -

  1. India Deploys Mig 29 Fighter : आता श्रीनगर तळावर मिग 29 तैनात, लढाऊ विमानाच्या तैनातीने दुश्मनांच्या उरात भरणार धडकी
  2. हवाई दलातील लढाऊ मिग-21 विमान नाही दिसणार लढाईच्या रिंगणात, जाणून घ्या कारण
  3. Indian Army : भारतीय हवाई दलात होणार भरती ; पहा किती जागा रिक्त

Last Updated : Nov 16, 2023, 10:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.