ETV Bharat / state

शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलगी गरोदर - shirur minor girl news

शिरुर येथील एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला फिरण्याच्या बहाण्याने घेऊन जात तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. सदर युवती गरोदर राहिल्याने सर्व प्रकार उघडकीस आला.

शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, मुलगी गरोदर

author img

By

Published : Jun 5, 2021, 3:41 PM IST

शिक्रापूर/पुणे - शिरुर तालुक्यातील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला फिरण्याच्या बहाण्याने घेऊन जात तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. सदर मुलगी गरोदर राहिल्याने सर्व प्रकार उघडकीस आला. शिक्रापूर पोलिसांनी महेश दत्तात्रय गोरडे या युवकावर गुन्हे दाखल करत त्याला अटक केली आहे.

जबरदस्तीने मुलीशी शारीरिक संबध

शिरुर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीशी गावातील महेश गोरडे या युवकाने ओळख करून घेतली. दरम्यान त्याने मुलीला त्याच्या जवळील मोटारीमध्ये फिरायला घेऊन जाण्याचा बहाणा करत खेड तालुक्यातील एका हॉटेलवर घेऊन गेला. जबरदस्तीने युवतीशी शारीरिक संबध केले. या घटनेनंतर त्याने कोणाला काही न बोलण्याची धमकी देत युवतीला घरी आणून सोडले. त्यांनतर युवती गरोदर राहिली. मात्र तिला काहीही समजून आले नाही. परंतु घरातील व शेजारील महिलांना तिच्याबाबत काही संशय आल्याने त्यांनी तिच्याकडे विश्वासात घेत चौकशी केली असता युवतीने घडलेला प्रकार पालकांना सांगितला.

वैद्यकीय तपासणी केली असता युवती गरोदर असल्याचा खळबळजनक प्रकार समोर

युवतीची वैद्यकीय तपासणी केली असता युवती गरोदर असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. याबाबत पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी महेश दत्तात्रय गोरडे (वय २५ वर्षे ) याच्या विरुद्ध बाललैंगिक अत्याचारासह इतर गुन्हे दाखल करत त्याला अटक करून त्याने गुन्ह्यात वापरलेली मोटार देखील जप्त केली आहे. महेश गोरडे याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके व पोलीस नाईक प्रताप कांबळे हे करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.