पुणे - कोरेगाव भीमा येथे आज (1 जानेवारी) 202वा शौर्य दिन साजरा होत आहे. विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी सकाळपासूनच अबालवृद्धांनी गर्दी केली आहे. राज्याच्याच नाही तर दोशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी याठिकाणी दाखल झाले आहेत. गर्दीच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.
हेही वाचा - कोरेगाव भीमा शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अजित पवारांनी दिली मानवंदना
अभिवादन सोहळा शांततेत पार पडावा यासाठी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईदेखील करण्यात आली आहे. बाहेर पडण्यासाठी विजय स्तंभाच्या दोन्ही बाजूंनी दोन मार्ग तयार करण्यात आले आहेत. परिसरामध्ये गर्दी नियंत्रणात रहावी यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. वाढत्या गर्दीसोबत लाकांचा उत्साहदेखील वाढलेला पहायला मिळत आहे.