ETV Bharat / state

Girish Mahajan Reaction: कालची जाहिरात ही नकळत आलेली जाहिरात - मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया - राधाकृष्ण विखे पाटील

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्तमानपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीवरून राज्यात आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरु आहे. तर आज थेट जाहिरात बदलण्यात आली आहे. शिंदे फडणवीस यांच्या बाजूने राज्यातील जनतेचा कौल असून 42 टक्के लोक शिंदे फडणवीस यांच्या बाजूने असल्याचे या जाहिरातीत म्हटले आहे. यावर राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

Medical Education Minister Girish Mahajan
राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन
author img

By

Published : Jun 14, 2023, 4:12 PM IST

माहिती देताना गिरीश महाजन

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्तमानपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीवरून मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, कालची जाहिरात आली कुठून हा प्रश्न आम्हाला देखील आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना देखील आहे. कालची जाहिरात ही नकळत आलेली जाहिरात आहे. माझी याबाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांना देखील माहीत नाही की, ही जाहिरात आली कुठून. न कळत कार्यकर्त्यांकडून गेलेली ती जाहिरात होती. म्हणून आज ही जाहिरात दिली आहे, असे यावेळी गिरीश महाजन म्हणाले.

तेव्हा समजेल किसमे कितना दम : पुण्यात राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत स्वच्छता दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. तसेच ते पुढे म्हणाले की, जी काही चर्चा सुरू आहे युतीत मतमतांतरे आहे, असे काही नाही. आम्ही एकत्र असून पुढील निवडणुका भाजप सेना मिळूनच आम्ही लढवणार आहे. जेव्हा निवडणूक लागणार तेव्हा कळेल की, किसमे कितना दम आहे.

निर्मल वारी स्वच्छ वारी : गेल्यावर्षी पेक्षा जास्त वारकरी यंदा वारीत सहभागी झाले आहेत. वारकऱ्यांच्या वाढत्या संख्येला लक्षात घेत त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. निर्मल वारी स्वच्छ वारी आली पाहिजे ही सर्वांची इच्छा आहे. शासन त्यादृष्टीने प्रयत्न करत आहे. यंदाच्या वारीसाठी 21 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या आरोग्याची तसेच पाण्याची काळजी शासनाच्या वतीने घेण्यात येत आहे.

म्हणून उपमुख्यमंत्री कोल्हापूरला गेले नाही : संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर महाजन म्हणाले की, मला सर्वांच्या आरोग्याची काळजी असते. मला माहीत आहे की, सतत विमानाने प्रवास करून उपमुख्यमंत्री यांच्या कानाला त्रास होत आहे. दोन ते तीन दिवस विमानाने प्रवास करू नका असा सल्ला त्यांना डॉक्टरांनी दिला आहे. म्हणून उपमुख्यमंत्री काल कोल्हापूर येथे गेले नाही. जाहिरातीमुळे नाराज आहे असे जे म्हटले जात आहे, ते चुकीचे असल्याचे यावेळी महाजन यांनी सांगितले.

बोगस बियाणेचा सुळसुळाट सुटला आहे : 5 मंत्र्यांना डच्चू दिले जाणार आहे, असे सांगितले जाते आहे. यावर महाजन म्हणाले की, ही बातमी फेक असून फक्त चर्चा आहे. हा विषय आला कुठून असे यावेळी महाजन म्हणाले. तसेच काल मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री यांनी नाराजगी व्यक्त केली. यावर महाजन म्हणाले की, हे खर आहे. राज्यात बोगस बियाणेचा सुळसुळाट सुटला आहे. शेतकरी वर्षभर मेहनत घेतात, पेरणीच्या वेळेस बोगस बियाणे आली तर वर्ष वाया जातो. त्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्याने चांगली बियाणे मिळावी यावर काल मंत्रिमंडळात चर्चा झाली असल्याचे यावेळी महाजन म्हणाले.

शिवसेनेचे आमदारांनी जाहिरात दिली : झाकीर नाईक यांच्याकडून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संस्थेला 500 कोटी देण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केले आहे. यावर महाजन म्हणाले की, हे मला माहीत नाही मी पहिल्यांदाच ऐकत आहे. याची खातरजमा केली पाहिजे. कोणीतरी खोटा आरोप केला असेल असे देखील यावेळी महाजन म्हणाले. आजच्या जाहिरातीमध्ये फक्त सेनेच्या मंत्र्यांचा फोटो लावण्यात आले आहे. यावर महाजन म्हणाले की, आजची जाहिरात शिवसेनेचे आमदारांनी दिली आहे, ती जाहिरात खूपच चांगली आली आहे. त्यामुळे त्यांचे फोटो येतील.

हेही वाचा -

  1. Akola Riots अकोल्यात दोन समाजाच्या गटामध्ये झालेली दंगल ही पूर्वनियोजित गिरीष महाजनांना संशय
  2. JJ Hospital Financial Scam जेजे रुग्णालयातील डॉक्टरांनी केली परदेश वारीवर उधळपट्टी गिरीश महाजन म्हणाले
  3. Asmita Yojana मुली महिलांसाठी आनंदाची बातमी सॅनिटरी नॅपकिन मिळणार १ रुपयात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.