पुणे - पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि कृष्णा डायग्नोस्टीक यांच्या सहकार्याने 'कोविड-१९ बस' या अत्याधुनिक प्रयोगशाळेचे महापौर माई ढोरे यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले. पिंपरी-चिंचवड शहरातील कंटेन्मेंट झोनमधील हायरिस्क कॉन्टॅक्ट मधील नागरिकांना याचा फायदा होणार आहे. तसेच अन्य आजाराने त्रस्त असेलेल्या व्यक्तींसोबत जेष्ठ नागरिकांची मोफत कोरोना टेस्ट या प्रयोगशाळेत करण्यात येणार आहे.
यामार्फत शहरातील विविध ठिकाणी जाऊन चाचण्या करता येणे शक्य आहे. यामुळे रुग्णांनी तपासणीसाठी बाहेर पडण्याची गजर संपणार आहे. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदतच होणार आहे. याव्दारे कोविड-१९ पूर्व चाचणी, मोबाईल एक्सरे, रक्त तपासणी व रक्तदाब तपासणी करण्यात येणार आहे. येणाऱ्या काळात यामार्फत जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. प्रामुख्याने कंटेन्मेंट झोनमधील हायरिस्क कॉन्टॅक्ट मधील नागरिक व दुर्धर आजाराने त्रस्त व जेष्ठ नागरिकांची कोवीड चाचणी विनामूल्य होणार आहे.