ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये पत्नीला अश्लील बोलणाऱ्या मित्राचे अपहरण करून हत्या - पिंपरी-चिंचवडमध्ये मित्राचे अपहरण करून हत्या

रोहित किसन कांबळे (वय १९), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेप्रकरणी आरोपी आकाश साळवे (वय २५) आणि इलियाज शेख (वय २१) यांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील संगमवाडी येथे रोहितचा मृतदेह सापडला आहे.

मृत रोहित किसन कांबळे
author img

By

Published : Oct 6, 2019, 7:46 PM IST

पुणे - पत्नीला अश्लील बोलल्याच्या कारणावरून मित्राचे अपहरण करून खून केल्याची घटना समोर आली आहे. रोहित किसन कांबळे (वय १९), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेप्रकरणी आरोपी आकाश साळवे (वय २५) आणि इलियाज शेख (वय २१) यांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रोहित किसन कांबळे याचे गुरुवारी अपहरण झाले होते. याप्रकरणी मृत रोहितच्या आईने वाकड पोलिसात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार वाकड पोलीस रोहितचा शोध घेत होते. दरम्यान, आज पुण्यातील संगमवाडी येथे रोहितचा मृतदेह सापडला आहे. या घटनेचा अधिक तपास केल्यानंतर मित्रानेच खून केल्याचे उघड झाले आहे. मृत रोहित, आरोपी आकाश आणि इजियाज हे तिघे मित्र होते. वाकड ते काळेवाडी फाटा यादरम्यान रिक्षा चालवण्याचा व्यवसाय ते करत होते. मृत रोहित हा आकाशच्या पत्नीला अश्लील बोलला होता. या कारणावरून त्यांच्यात अनेकदा वादही झाला होता. मात्र, आकाशला झालेली घटना स्वस्त बसू देत नव्हती. त्यामुळे त्याने मित्र इलियाजच्या साथीने रोहितचे अपहरण केले.

हेही वाचा - पुण्यात पुन्हा जळीतकांड, पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना आग

ठरलेल्या योजनेप्रमाणे गुरुवारी त्याच्याच रिक्षातून रोहितला लोणावळा येथे फिरण्यासाठी जाऊ असे म्हणून तळेगाव परिसरातील भेगडेवाडी येथे नेण्यात आले. तिथे दोघांमध्ये भांडण झाले, यातून आकाशने साथीदार इलियाजच्या मदतीने रोहितचा गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी दोघांनी रिक्षातून रोहितचा मृतदेह पुण्यातील संगमवाडी परिसरात बेवारस फेकून दिला. वाकडचे सहाययक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी अवघ्या काही तासांतच मुख्य आरोपींना गजाआड केले आहे.

Intro:mh_pun_02_murder_av_mhc10002Body:mh_pun_02_murder_av_mhc10002

Anchor:- पत्नीला अश्लील बोलल्याच्या कारणावरून मित्रानेच मित्राचा अपहरण करून खून केल्याची घटना समोर आली आहे. रोहित किसन कांबळे वय-१९ असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटने प्रकरणी आरोपी आकाश साळवे वय-२५ आणि इलियाज शेख वय-२१ यांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पुण्यातील संगमवाडी येथील नदीत फेकून देण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रोहित किसन कांबळे याचे गुरुवारी अपहरण झाले होते. या प्रकरणी मयत रोहित च्या आईने वाकड पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानुसार वाकड पोलीस रोहित चा शोध घेत होते. दरम्यान, आज पुण्यातील संगमवाडी येथे रोहित चा मृतदेह मिळाला आहे. या घटनेचा अधिक तपास केल्यानंतर मित्रानेच खून केल्याचं उघड झाले आहे. मयत रोहित, आरोपी आकाश आणि इजियाज हे तिघे मित्र असून वाकड ते काळेवाडी फाटा येथे रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत. मयत रोहित हा आकाश च्या पत्नीला अश्लील बोलला होता. या कारणावरून त्यांच्यात अनेकदा वाद ही झाला होता. मात्र, आकाश ला झालेली घटना स्वस्त बसू देत नव्हती. त्यामुळे त्याने मित्र इलियाज च्या साथीने रोहित चे अपहरण करून काटा काढायचा अस ठरविल होत.

ठरलेल्या योजनेप्रमाणे गुरुवारी त्याच्याच रिक्षातून रोहित ला लोणावळा येथे फिरण्यासाठी जाऊ असे म्हणून तळेगाव परिसरातील भेगडेवाडी येथे नेण्यात आले. तिथे दोघांमध्ये भांडण झाले, यातून आकाश ने साथीदार इलियाज च्या मदतीने रोहित चा गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी दोघांनी रिक्षातून रोहित चा मृतदेह पुण्यातील संगमवाडी परिसरात बेवारस फेकून दिला. वाकडचे सहाययक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी अवघ्या काही तासातच मुख्य आरोपींना गजाआड केलं आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.