ETV Bharat / state

शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांना योग्य न्याय देण्याची माझी भूमिका - आसगावकर

या यशात तिन्ही पक्षाचा मोठा वाटा आहे. या यशाचे सोने शिक्षण क्षेत्रात करता येणार आहे. येत्या काळात शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांना योग्य न्याय देण्याची माझी भूमिका असणार आहे, असे प्रा. जयंत आसगावकर यांनी यावेळी सांगितले.

आसगावकर
आसगावकर
author img

By

Published : Dec 4, 2020, 10:23 PM IST

पुणे - शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांना न्याय देणार आहे, मागील 31 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला काँग्रेसने उमेदवारी दिली. महाविकास आघाडीच्या सहकार्यामुळे कमी कालावधीत प्रभावी प्रचार करता आला. या यशात तिन्ही पक्षाचा मोठा वाटा आहे. या यशाचे सोने शिक्षण क्षेत्रात करता येणार आहे. येत्या काळात शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांना योग्य न्याय देण्याची माझी भूमिका असणार आहे, असे प्रा. जयंत आसगावकर यांनी यावेळी सांगितले.

महाविकास आघाडी सरकारने वर्षभरात अनेक संकटांचा सामना करीत जनतेची सेवा केली आहे. राज्यातील सुज्ञ मतदारांनी त्याची जाण आणि भान ठेवून विक्रमी मताचा कौल दिला. येत्या काळातही जनता केंद्रित कामांनाच महाविकास आघाडी सरकारचे प्राधान्य असेल, अशी भावना राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी व्यक्त केली. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाल्यानंतर काँग्रेस भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. कदम बोलत होते.

शिक्षक आणि पदवीधरांचे अनेक प्रश्न प्रलंबित

यावेळी विजयी उमेदवार प्रा. जयंत आसगावकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे. शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे, ज्येष्ठ नेते उल्हास पवार आदी उपस्थित होते. डॉ. कदम म्हणाले, कोरोनाचे संकट राज्य सरकारने यशस्वीपणे हताळले आहे. कर्जमाफी, शिवभोजन थाळी सारखे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. भाजपच्या काळात नोटाबंदी, जीएसटीमुळे बेकारी निर्माण झाली आहे. शिक्षक आणि पदवीधरांचे अनेक प्रश्न भाजपने प्रलंबित ठेवले. त्याचे उत्तर मतदारांनी बहुमतातून दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.