पुणे - नाशिक महामार्गावर राजगुरुनगर जवळ पानमळा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा अपघाती मृत्यु झाला. ही घटना आज रात्रीच्या सुमारास घडली असून वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी बिबट्याची तपासणी करून मृत घोषित केले आहे. शवच्छेदन करुन उद्या (20मार्च) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
राजगुरुनगर शहराजवळ बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे. आज संध्याकाळच्या सुमारास हा बिबट्या शिकारी मागे धावत होता. पानमळा येथे पुणे-नाशिक महामार्गावर रस्ता पार करत असताना अज्ञात अवजड वाहनाची धडक लागून बिबट्याचा जागीच मृत्यू झाला.
गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा शिकारीच्या मागे धावत असताना अपघाती मृत्यूच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र, वनविभागाच्या माध्यमातून बिबट्याच्या संगोपनासाठी ठोस उपाययोजना होताना दिसत नसल्याने प्राणीमित्रांमध्ये नाराजीचा सुरू आहे.
हेही वाचा - 'वर्क फ्रॉम होमची सक्ती करताना आयटी कंपन्यांच्या अडचणी लक्षात घेऊन विषय हाताळला जाईल'