पुणे - शिरूर तालुक्यातील शिक्रापूर राऊतवाडी येथील दत्तु थोरात यांच्या मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली. बिबट्याच्या या हल्ल्यात एक मेंढी, घोडी आणि दोन कुत्रे गंभीर जखमी झाले असून मेंढपाल दत्तु थोरात यामध्ये थोडक्यात बचावले.
हेही वाचा - पुण्यात टिकटॉक वरुन साकारला 'आळंदी पॅटर्न'; 6 जणांना अटक
पुणे जिल्ह्यातील शिरुर, खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील ऊसशेती परिसरात बिबट्यांची संख्या वाढल्याने लोकवस्तीत बिबट्याचा वावर वाढला आहे. परिणामी बिबट्यांचे पाळीव प्राण्यावर हल्ले वाढल्याने मेंढपाळांसह नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
हेही वाचा - नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा देत पुण्यात मानवी साखळी
जंगलामध्ये मुक्तपणे फिरणारा बिबट्या सध्या लोकवस्तीत वावरत आहे. त्यातून हा बिबट्या पाळीव प्राणी, माणसांवर शिकारीच्या हेतुने हल्ले करत आहे. तर कधी शिकारीच्या शोधात भटकंती करत असताना बिबट्याला अपघातांचा सामना करावा लागत आहे. मात्र, वनविभाग अशा घटना गांभिर्याने घेत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.