ETV Bharat / state

पर्यटक न आल्याने लोणावळ्यात व्यवसायिकांचे मोठे नुकसान - lonavala cororna news

यावर्षी कोरोना आणि नाईट कर्फ्युमुळे पर्यटक न आल्याने लोणावळ्यातील स्थानिक आणि किरकोळ व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोना आणि नाईट कर्फ्युमुळे पर्यटनस्थळी शुकशुकाट होता.

lanavala loss of local business
लोणावळ्यात पर्यटक न आल्याने व्यवसायिकांचे मोठे नुकसान
author img

By

Published : Jan 1, 2021, 1:58 PM IST

लोणावळा (पुणे) - दरवर्षी लोणावळ्यात वर्षाअखेर पर्यटकांची प्रचंड गर्दी होते. मात्र, यावर्षी कोरोना आणि नाईट कर्फ्युमुळे पर्यटक न आल्याने स्थानिक आणि किरकोळ व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोना आणि नाईट कर्फ्युमुळे पर्यटनस्थळी शुकशुकाट होता. याचा फटका स्थानिक किरकोळ व्यापाऱ्यांना बसला आहे. याबाबत स्थानिक किरकोळ व्यापारी भीमा शिंगाडे यांनी माहिती दिली आहे.
दरवर्षी मोठ्या प्रमाणात व्यवसाय
दरवर्षी लोणावळा शहर आणि पर्यटनस्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत असते. त्यामुळे स्थानिक किरकोळ व्यवसायिकांना मोठा फायदा व्हायचा. पावसाळा आणि नाताळ ते नवीन वर्ष या दरम्यान जास्त पर्यटक येत असतात. यावर्षी कोरोना आणि नाईट कर्फ्युमुळे पर्यटकांनी लोणावळ्याकडे पाठ फिरवली आहे. त्यात आठ महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प होता. पावसाळ्यातील सिझन गेले, मात्र प्रशासनाने पर्यटनस्थळावरील बंदी उठवल्याने किमान नाताळ आणि नवीन वर्षादरम्यान काही तरी व्यवसाय होण्याची शक्यता होती. मात्र महानगरासह लोणावळ्यात नाईट कर्फ्यु लागू करण्यात आला.

लोणावळा व्यवसायिकांचे मोठे नुकसान
स्थानिक व्यवसायाला 70 टक्के फटका बसलानाईट कर्फ्युचा थेट फटका व्यापारी व्यवसायाला बसला. दरवर्षी नाताळ आणि नवीन वर्षीसाठी तीन लाख पर्यटक लायन्स आणि टायगर पॉईंट येथे दाखल होतात. यावर्षी तुरळक पर्यटक दाखल झाले, त्यांचा ही हिरमोड झाला. एकूणच स्थानिक किरकोळ व्यवसायाला 70 टक्के फटका बसला आहे. हेही वाचा - 31 डिसेंबरला नार्कोटिक्स विभागाची मुंबईत छापेमारी; तिघे ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.