ETV Bharat / state

ललित पाटील ड्रग्स प्रकरण; सुषमा अंधारेंना नाशिकहून पत्र, अनेक राजकीय नेत्यांची नावं पत्रात असल्याचा अंधारेंचा दावा

Lalit Patil Drugs Case : ललित पाटील ड्रग्स प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना नाशिक इथून एक पत्र आल्याचा दावा केला. यात अनेक राजकीय नेत्यांची नावं असल्याचाही दावा सुषमा अंधारेंनी केलाय.

Lalit Patil Drugs Case
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 30, 2023, 10:30 AM IST

Updated : Nov 30, 2023, 12:25 PM IST

पुणे Lalit Patil Drugs Case : ललित पाटील ड्रग्स प्रकरणात अनेक राजकीय लोकांचे संबंध असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यापूर्वीच केला होता. त्यानंतर आता सुषमा अंधारे यांना नाशिकवरुन एक पत्र आल्याचा दावा त्यांनी केला आहे. या पत्रात तब्बल 40 पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांची नावं आहेत, तसंच 'छोटी भाभी, मोठी भाभी' असे काही संदर्भ यात दिसत असल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे.

पत्राबाबत काय म्हणाल्या सुषमा अंधारे : या पत्रासंदर्भात सुषमा अंधारे यांनी माहिती देताना म्हटलंय की, नाशिकमधून मला एक पत्र आलंय. सुरुवातीला हे पत्र मला धमकीचं आहे, असं वाटलं. त्यामुळं हे उघडताना मी काळजी घेतली. हे पाच पानाचं पत्र आहे. या पत्रात ललित पाटील ड्रक्स प्रकरणात अनेक राजकीय लोकांची नावं आहेत. ती नावं मी सध्या सांगणार नाही. परंतु, याचा संबंध जळगाव, वडाळा या ठिकाणी झाला असल्याचं या पत्रात म्हटलेलं आहे. त्याचबरोबर 'छोटी भाभी, मोठी भाभी' असा काही उल्लेख यात असल्याचा दावा सुषमा अंधारेंनी केला आहे.

ललित पाटील प्रकरणाच्या चौकशीची मागणी : हे पत्र ज्यांनी लिहिलंय, त्यांनी या पत्रात "ताई आम्ही खूप छोटे लोक आहोत. हे पत्र आम्ही माध्यमांमध्ये या गोष्टी समोर आल्या पाहिजे याची चौकशी झाली पाहिजे, यामुळं लिहिलं" असं पत्रात नमूद असल्याचं सुषमा अंधारेंनी सांगितलंय. तसंच सुरुवातीपासूनच आम्ही या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करत आहोत. मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचलं पाहिजे, अशी आमची इच्छा आहे. पण ललित पाटील प्रकरणाचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात केला जातोय. पोलिसांना जर याची माहिती उपयोगी पडत असेल, तर त्यांनी ती जरुर घ्यावी. मी त्यांना देईन. परंतु, याचा तपास होणं गरजेचं असल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. मात्र या पत्रातली नावं मात्र त्यांनी आज जाहीर केलेली नाहीत.

हेही वाचा :

  1. Lalit Patil Case : ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या मालमत्तेची चौकशी सुरू; पुणे पोलीस दोन दिवसांपासून नाशकात तळ ठोकून
  2. Lalit Patil Drugs Case : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामुळं चर्चेत आलेल्या ससूनच्या 'डीन'ला दणका; मॅटनं नेमणूक केली रद्द
  3. Ravindra Dhangekar PC : ललित पाटील प्रकरणात डॉ. संजीव ठाकूर यांना सहआरोपी करावं - आमदार रवींद्र धंगेकर

Last Updated : Nov 30, 2023, 12:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.