ETV Bharat / state

Lalit Patil Drug Case : ललित पाटील ड्रग्स प्रकरण: आरोपी अरविंद लोहारेला 25 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

Lalit Patil drugs case: ललित पाटील ड्रग्स प्रकरणात आज पुणे पोलिसांकडून आरोपी भूषण पाटील, ( Bhushan Patil) अभिषेक बलकवडे, (Abhishek Balakawade) अरविंद लोहारे (Arvind Lohare) यांना न्यायालयात हजर केलं गेलं. यापूर्वी ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोघांनाही आजपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. या दोघांना आज 1 दिवस वाढवून पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे तर अरविंद लोहारे याला 25 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. (Arvind Loharela police custody)

ललित पाटील ड्रग्स प्रकरण
Lalit Patil drugs case
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 22, 2023, 6:33 PM IST

पुणे Lalit Patil Drugs Case : ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांची आज पोलीस कोठडी संपली होती. त्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. आतापर्यंत त्यांना बारा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर आज परत एक दिवसाची कोठडी वाढवून उद्यापर्यंत या दोघांना पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे.

लोहारेला तीन दिवसांची पोलीस कोठडी : तरी याच प्रकरणात पुणे पोलिसांनी येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या अरविंद लोहारे याला सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. परंतु, न्यायालयाने त्याला सुद्धा तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. यावेळी न्यायालयाने अरविंद लोहारे याला विचारलं तुला काही सांगायचं आहे का, तुझे वकील आहेत का? तर त्याने मला जे काही सांगायचे ते मी सांगितलं आहे. यापेक्षा माझ्याकडे काही जास्त नाही असं न्यायालयात सांगितले.

लोहारेला कारखाने आणि ड्रग्ज बनविण्याचे प्रशिक्षण : चाकण येथील ड्रग्स प्रकरणात अटकेत असलेला अरविंद लोहारे आणि ललित पाटील याची ओळख येरवडा कारागृहात झाली. अरविंद लोहारे हा बीएस्सी मेकॅनिकल इंजिनिअर आहे. त्याने हे ड्रग्स कसे बनवायचे, कारखाने कसे तयार करायचे याचे प्रशिक्षण त्याला दिलं. त्याचबरोबर असे आठ ठिकाणी वेगवेगळे कारखाने त्याने बनवले असून त्याची चौकशी आम्हाला करायची आहे. त्याचबरोबर ललित पाटलांची सुद्धा काही माहिती घ्यायची असल्याने आम्हालाही पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे न्यायालयात सांगण्यात आलं होतं.

कारखान्याची, ललित पाटीलच्या घराची झडती : भूषण पाटील अभिषेक बलकवडे यांची सुद्धा कोठडी आज संपली होती. त्यांना सुद्धा एक दिवसाची म्हणजे उद्या 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. आजच मुंबई पोलिस नाशिक येथे ललित पाटीलला घेऊन गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी कारखान्याची, त्याच्या घराची झडती घेतली आहे. पण ललित पाटील अजून काही पुणे पोलिसांकडे ताब्यात देण्यात आलेला नाही. त्यामुळे आणखी तपासाची आवश्यकता असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. यापूर्वी ललित पाटीलची मैत्रीण प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम या दोघी पोलीस कोठडीमध्ये आहेत. त्यांची पोलीस कोठडी उद्या संपणार आहे. त्यानंतर त्यांना हजर करण्यात येणार आहे.

पुणे पोलिसांची कोर्टात मोठी माहिती : चाकणच्या ड्रग्ज प्रकरणात अरविंद लोहारे अटक होता. कारागृहात लोहारेने ललित पाटीलला मॅफेडरॉन बनवण्याची कंपनीच सेटअप करून दिलं आहे. लोहारे हा एमएससी केमिस्ट्री झालं आहे. त्याने आता पर्यंत 10 केमिकल कंपनीत काम केलं आहे. महाडला पण त्याने स्वत:ची कंपनी स्थापन केली. या तिघांची पोलिसांना समोर समोर चौकशी करायची आहे.

हेही वाचा:

  1. Dada Bhuse On Lalit Patil Case: संजय राऊतांच्या मार्गदर्शनात ड्रग्ज माफिया ललित पाटील शिवसेनेत आला होता- दादा भुसे
  2. Shushma Andhare : ड्रग्स माफिया ललित पाटीलचा अनिल जयसिंघानिया केला जाईल का? सुषमा अंधारेंचा सवाल
  3. Lalit Patil Case: ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणी भाऊ भूषण पाटील, अभिषेक बलकवडे 5 दिवसांची पोलीस कोठडी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.