ETV Bharat / state

Kopardi Rape Case : आरोपीचा मृतदेह कोपर्डीत आणण्यास गावकऱ्यांचा विरोध; पुण्यात केले अंत्यसंस्कार

Kopardi Rape Case : कोपर्डी प्रकरणात शिक्षा भोगत असलेला मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदेनं रविवारी कारागृहातच आत्महत्या केली होती. त्याच्यावर अंत्यसंस्कार कोपर्डीत होणार होते. मात्र, गावात अंत्यसंस्कार करण्यास गावकऱ्यांनी विरोध केला. त्यामुळे पुण्यातील कैलास स्मशानभूमीत मध्यरात्री उशिरा आरोपीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 11, 2023, 12:31 PM IST

Updated : Sep 11, 2023, 12:41 PM IST

Kopardi Rape Case
आरोपी पप्पू शिदेंवर कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

पुणे : Kopardi Rape Case : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी तीन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. यातील पप्पू शिंदे या आरोपीने पुण्यातील येरवडा कारागृहात रविवारी आत्महत्या केली होती. तर नगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात अंत्यसंस्कार करण्यासाठी गावकऱ्यांनी विरोध केला. त्यामुळे आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदेवर (Convict Jitendra Shinde) पुण्यातील कैलास स्मशानभूमीत (Kailash Cemetery Pune) मध्यरात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

काय आहे कोपर्डी प्रकरण : अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी येथे 13 जुलै 2016 च्या संध्याकाळी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आंदोलन पेटले होते. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी मराठा समाजाने राज्यभर आंदोलन केलं होतं. या आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळाला होता. तर दोषी तिघांना फाशी दिली तरच आमच्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबाने केली होती. अखेर त्या तीनही आरोपींना अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती.

फाशीची शिक्षा सुनावली होती : कोपर्डी येथील सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे याने येरवडा कारागृहात आत्महत्या केली. तो येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. आरोपी जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष मवाळ या तिघांनी 13 जुलै 2016 रोजी नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे शालेय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली होती. या प्रकरणी नोव्हेंबर 2017 मध्ये तिन्ही आरोपींना दोषी ठरवून त्यांना फाशीची शिक्षा दिली होती.

आत्महत्या प्रकरणाची चौकशी होणार : पुणे : कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीने येरवडा कारागृहात आत्महत्या केली आहे. याबाबत आता येरवडा कारागृह प्रशासनाने माहिती दिली. आरोपी शिंदे मानसिक रुग्ण होता आणि त्याच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार देखील सुरू होते. तसेच या प्रकरणाची न्यायदंडाधिकारी स्तरीय चौकशी होणार असल्याची माहिती कारागृह प्रशासनानं दिली.

हेही वाचा -

  1. Kopardi Rape Case: कोपर्डी बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीची कारागृहात आत्महत्या; आरोपी मानसिक रुग्ण असल्याची प्रशासनाची माहिती
  2. ३ वर्षे उलटली, कोपर्डीतील निर्भयाच्या मारेकऱ्यांना फाशी कधी? आईचा सरकारला प्रश्न
  3. कोपर्डी प्रकरण: घटनेला ३ वर्ष पूर्ण, पीडितेचे कुटुंबीय अद्यापही न्यायाच्या प्रतिक्षेत

Last Updated : Sep 11, 2023, 12:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.