ETV Bharat / state

ई़डी प्रकरण : 'राजकीय नेत्यांना त्रास देणं ही भाजपाची जुनी सवय' - jayant patil in maval

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने टाकलेल्या छाप्यातून काही साध्य होणार नसल्याची खात्री आहे, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले. राजकीय नेत्यांना अशाप्रकारे त्रास देणं ही भाजपची जुनी सवय असल्याची टीका त्याांनी केली.

jayant patil in pune
ई़डी प्रकरण : 'राजकीय नेत्यांना त्रास देणं ही भाजपाची जुनी सवय'
author img

By

Published : Nov 25, 2020, 6:18 PM IST

पुणे - शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने टाकलेल्या छाप्यातून काही साध्य होणार नसल्याची खात्री आहे, असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. राजकीय नेत्यांना अशाप्रकारे त्रास देणं ही भाजपची जुनी सवय असल्याची टीका त्याांनी केली. जलसंपदा मंत्र्यांनी मावळमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपाच्या पदवीधर निवडणुकीतील उमेदवारावर देखील टीका केली.

ई़डी प्रकरण : 'राजकीय नेत्यांना त्रास देणं ही भाजपाची जुनी सवय'

महाविकासआघाडी अधिक बळकट होईल

महाविकासआघाडीला असं अडचणीत आणलं, तर यातून आघाडी अधिक बळकट होईल. हे भाजपाने लक्षात घ्यायला हवं, असे पाटील म्हणाले. महाविकासआघाडीचे सरकार पडेल, असं भाजपाकडून प्रत्येक वेळी बोलण्यात येत होतं. त्यामुळं यावर प्रतिक्रिया द्यावीशी वाटली नाही, असे पाटील म्हणाले.

भाजपाच्या पदवीधर उमेदवारावर टीका

भाजपाच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील उमेदवारांवर जयंत पाटील यांनी टीका केली. भाजपाच्या उमेदवाराची गुगल करून माहिती घ्यावी. तसेच निष्ठवंतांना डावलण्याची सवय भाजपला आहे, असा टोला त्यांनी लगावला. राष्ट्रवादीच्या लोकांना भाजपामध्ये संधी दिली जाते. भाजपा आणि त्यांचे कार्यकर्ते आक्रमक काम करत नाहीत. सध्या निराश आहेत. त्यामुळे तिन्ही पक्षांनी काम केल्यास उमेदवार निवडून येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय.

jayant patil in pune
जलसंपदा मंत्र्यांनी मावळमध्ये पत्रकारांशी संवाद साधला.

काय आहे ईडी प्रकरण?

शिवसेना खासदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील निवासस्थानी ईडीचे छापे पडले. काल(ता.24 नोव्हेंबर) सकाळी आठ वाजेपासून याठिकाणी छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर आली. यासोबतच शिवसेनेचे आणखी काही नेते ईडीच्या रडारवर असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी करण्यात आलेली कारवाई ही ईडी च्या दिल्लीच्या पथकाने केली. या पथकासोबत सीआरपीएफचे पथक देण्यात आले होते.

कोण आहेत प्रताप सरनाईक?

प्रताप सरनाईक हे सलग तीन वेळा शिवसेनेच्या तिकीटावर ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. आताच्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात शिवसेनेकडून त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र, त्यांना ते मिळाले नाही. नगरसेवक ते आमदार असा त्यांचा हा प्रवास राहिलेला आहे.

विहंग सरनाईक ईडीच्या ताब्यात

प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले. ठाण्याच्या हिरानंदानी येथील निवासस्थानावरून त्यांना ताब्यात घेण्यात आले. विहंग सरनाईक है प्रताप सरनाईक यांचे लहान पुत्र असून, त्यांच्या मोठ्या मुलाचे नाव पूर्वेश सरनाईक असे आहे. विहंग यांच्या नावाने विहंग कन्स्ट्रक्शन हा त्यांचा व्यवसाय चालतो, तर पूर्वेश हे युवा सेनेचे सचिव आहेत. ठाण्यातल्या हिरानंदानी इस्टेटमधील त्यांच्या घरातून विहंग यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले असून ठाण्यातल्या इतर ठिकाणी ईडीचे अधिकारी छापेमारी करण्याची शक्यता आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.