बारामती - जिल्हा क्रीडा संकुल पुणे (बारामती) मधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दोन लॉन टेनिस कोर्टचे उद्घाटन महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनील पावडे यांच्या हस्ते आज पार पडले.
बारामती येथे पुणे जिल्ह्यातील जिल्हा स्थरावरील क्रीडा संकुल उभे आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार क्रीडा संकुल बारामती येथे खेळाडूंसाठी विविध प्रकारच्या सुविधा उभारणीचे कामकाज जोरात चालू आहे. यामध्येच एक असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दोन लॉन टेनिस कोर्टचे उद्घाटन महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनील पावडे यांच्या पार पडले. खेळाडूंनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन पावडे यांनी यावेळी केलं.
हे क्रीडा संकुल खेळाडूंसाठी उत्तम दर्जाचे क्रीडा हब होत आहे ही एक चांगली जमेची बाजू आहे. या टेनिस कोर्टचे काम तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी अथक परिश्रमाने उच्च दर्जाचे काम वेळेत पूर्ण केले. तसेच उपमुख्यमंत्री पवार यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील आणि बारामती बँकेचे चेअरमन अविनाश लगड यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. या प्रसंगी बारामती बँकेचे चेअरमन अविनाश लगड, लटपटे, महावितरणचे देवकाते, बारामती लॉन टेनिस असोसिएशनचे सचिव दत्ता बोराडे, क्रीडा संकुलचे कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना.. पिंपरी-चिंचवडमध्ये लहान मुलांसाठी कोविड हॉस्पिटल
हेही वाचा - मराठा आरक्षणावरून उद्रेक होईल - खासदार उदयनराजे भोसले