बारामती - हिराभाई बुटाला विचारमंचाने फिरता दवाखाना (मोबाइल क्लिनिक व्हॅन) सुरू केला आहे. त्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बुटाला विचारमंचाचे कौस्तुभ बुटाला आणि प्रतिभा हांडेकर हे उपस्थित होते.
मोफत तपासणी व औषधे
या फिरत्या दवाखान्यामार्फत बारामती शहरातील नागरिकांची मोफत तपासणी केली जाणार आहे. तसेच, औषधेही मोफत दिली जाणार आहेत.
दाना इंडियाकडून मिनी व्हेंटिलेटर भेट
पुण्याच्या हिंजवडी येथील दाना इंडिया टेक्निकल सेंटर प्रा.लि. यांच्या CSR फंडातून व मिलिंद वालवाडकर यांच्या प्रयत्नातून बारामती येथील सिल्व्हर ज्युबिली शासकीय रूग्णालयास मिनी व्हेंटिलेटर (पोर्टेबल बायपास) देण्यात आले. त्याचेही लोकार्पण अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
अमेरिकेतील डॉक्टरकडून 25 म्यूकरमायकोसिसचे डोस भेट
यावेळी अमेरिकेतील डॉ. दीपेश राव यांच्याकडून म्यूकरमायकोसिससाठी लागणाऱ्या इंजेक्शनचे 25 डोस रुई ग्रामीण रुग्णालयास देण्यात आले. ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.
हेही वाचा - अभय बंग हे जगव्यापी समाजसुधारक, त्यांच्यामुळेच महाराष्ट्र व्यसनमुक्त - विजय वडेट्टीवार