पिंपरी-चिंचवड (मावळ) - पुणे जिल्ह्यातील तळेगाव परिसरात घरगुती भांडणामधून सुनेने सासूचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सून आणि मुलाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, मृतदेह पोत्यातून झुडपात टाकत असताना सीसीटीव्हीत कैद झाले आहे. बेबी गौतम शिंदे (वय 50) असे खून करण्यात आलेल्या सासूचे नाव आहे. तर पूजा शिंदे आणि मिलिंद शिंदे अशी आरोपींची नावे आहेत.
मुलाने केला पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव परिसरात राहणाऱ्या सासू बेबी आणि सुन पूजा यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. याचाच राग मनात धरून सुनेने ब्लाउज ने सासूचा गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह पोत्यामध्ये घालून टेरेसवर ठेवला व नंतर झुडपात नेऊन टाकून दिला. मृतदेह टाकत असताना स्थानिक तरुणांनी ते पहिले त्याला शंका आली असता त्यांनी पोलिसांशी संपर्क केला. त्यामुळे संबंधित घटना घडकीस आली आहे. मृतदेह टाकून आल्यानंतर टेरेसवर व सोसायटीच्या पायऱ्यावर पडलेले रक्त आरोपी मुलगा मिलिंद शिंदे याने धुऊन-पुसून घेतले व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, मयत सासू बेबी शिंदे यांचा मृतदेह झुडपात टाकत असतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी आरोपी मुलाला आणि सुनेला बेड्या ठोकल्या आहेत.
हेही वाचा - जनसंघर्ष सेनेच्या युवकांचा 'घरचा डबा' लॉकडाऊनमध्ये भुकेल्यांना ठरतोय आधार