ETV Bharat / state

सरकारला खासगी डॉक्टरांवर विश्वास नसेल तर, त्यांनी आमची रुग्णालये स्वतः चालवावीत - आयएमए - आयएमए महाराष्ट्र बातमी

राज्य सरकार रुग्णांसाठी वापरण्यात येणारा प्राणवायूच्या पुरवठ्यावर नियंत्रण आणत रुग्णांना किती लिटर ऑक्सिजन द्यायचा, यबाबत परिपत्रक काढले आहे, याचा निषेध इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्रने केला आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Sep 21, 2020, 4:57 PM IST

Updated : Sep 21, 2020, 8:26 PM IST

पुणे - राज्यातील खासगी डॉक्टर ऑक्सिजनचा अतिवापर करतात, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. राज्य सरकार खासगी रुग्णालयातील डॉक्टरांना वेठीस धरत असल्याचा आरोप करत इंडियन मेडिकल असोसिएशनने याचा निषेध केला आहे. जिथे ऑक्सिजन खाटा आहेत, तिथे एका मिनिटाला 7 लिटर आणि व्हेंटिलेटर खाटांसाठी मिनिटाला 12 लिटर ऑक्सिजन द्यावा, असे परिपत्रक राज्य सरकारने काढला आहे. राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकामुळे खासगी रुग्णालयात ऑक्सिजन अधिक वापरला जात असल्याचे सरकारचे म्हणणे आहे आणि त्यासाठी हे परिपत्रक काढल्याचा आरोप आयएमएचे आहे.

डॉ. अविनाश भोंडवे

मात्र, ऑक्सिजन वापराबाबतच्या पत्रकामुळे मृत्यूदर निश्चितच वाढेल, अशी भीती इंडियन मेडिकल असोसिएशनने व्यक्त केली आहे. राज्यातील कोरोनाचे अपयश लपवण्यासाठी महाराष्ट्र सरकार गोंधळलेल्या अवस्थेत असून सरकारला डॉक्टरांवर विश्वास नसेल तर, त्यांनी खासगी रुग्णालय स्वतः चालवावीत, अशी प्रतिक्रिया डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली. त्यामुळे राज्य सरकार विरुद्ध खासगी डॉक्टर यांच्यात वाद सुरू असलेला पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. भारतातील एकूण रुग्णांपैकी 20 टक्के रुग्ण फक्त महाराष्ट्रात आहे. पण, मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी भारताच्या 40 टक्के रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत, असे आयएमएचे म्हणणे असून कोरोना नियंत्रणातील अपयश लपवण्यासाठी महाराष्ट्र सरकार गोंधळलेल्या अवस्थेत खासगी रुग्णालयांना वेठीस धरत आहे. सरकारने काढलेल्या परिपत्रकामुळे मृत्यूदर निश्चितच वाढेल. या पद्धतीने डॉक्टरांचे एखाद्या रुग्णांच्या तब्येतीबद्दल जे काही निर्णय घ्यायचे आहे, त्याच्यावर झालेले हे आक्रमण आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र या परिपत्रकाचा तीव्र निषेध करत आहे, असे डॉ. भोंडवे म्हणले.

हेही वाचा - जम्बो रुग्णालयातील गरीब रुग्णाला रेमडेसिवीर औषध मोफत - राजेश टोपे

Last Updated : Sep 21, 2020, 8:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.