पुणे - मी आजपर्यंत कोणतीच निवडणूक हरलेलो नाही. कोल्हापूरमधून आजही निवडणूक लढवण्यास तयार आहे आणि तिथून निवडून आलो नाही तर राजकारण सोडून हिमालयात जाईन, असे थेट आव्हान भाजपा प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी टीकाकारांना दिले आहे. पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या प्रथम वर्षपूर्ती कार्य अहवालाचे प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
या मैदानात, थेट टीकाकारांना आव्हान -
कोथरूडमधून निवडून आलो तरी कोल्हापूरहून पळून आले, अशी टीका विरोधकाकडून होत आहे. पण मी अशा टीकेला भीत नाही. आजही कोल्हापूरमधील कोणत्याही विधानसभा मतदारसंघातील आमदाराने राजीनामा द्यावा आणि पोटनिवडणूक लावावी. मी निवडणूक लढायला तयार आहे, असे आव्हान पाटील यांनी टीकाकारांना दिले.
केंद्राचा आदेश होता -
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सूचनेनुसार कोथरूड येथून निवडणूक लढविण्याचे नक्की झाले होते. त्यावेळी प्रदेशाध्यक्षपद असल्याने पश्चिम महाराष्ट्राकडे दुर्लक्ष होईल, त्याचा फटका बसेल, असे मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. पण निर्णय झाला होता. त्यामुळे मी पूर्ण तयारीनिशी उतरलो, असे पाटील यांनी सांगितलं. यावेळी पाटील यांनी कोथरूडमध्ये त्यांना पाडण्यासाठी कोण-कोण, कशा पद्धतीने प्रयत्न करत होते, याचा लेखाजोखा मांडला.
हेही वाचा - शिरूर तालुक्यात उसाच्या शेताला आग, ऊस जळून खाक
हेही वाचा - पुणेकर क्रिकेटपटू ऋतुराजची IPL मध्ये तडाकेबंद कामगिरी, महापौरांनी कुटुंबियांना दिल्या शुभेच्छा