पुणे : आज माध्यमातून काँग्रेसकडून अशी चर्चा येत आहे की श्रेष्ठ लोकांना उमेदवारी दिली तर आम्ही ही निवडणूक बिनविरोध करू, तसा जर प्रस्ताव असेल तर भारतीय जनता पार्टी शैलेश टिळकांना उद्या तिकीट देईल आणि हेमंत रासने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील. त्यासाठी आम्ही तयार असल्याचे असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे.
भाजपतर्फे काढलेल्या रॅलीत शैलेश टिळकांची अनुपस्थिती : कसबा पोटनिवडणुकीमध्ये वेगळेच काही होण्याची तयारी सुरू झाली आहे का, अशा चर्चा होत आहेत. शैलेश टिळक किंवा कुणाल टिळक नाराज नाहीत. पण, पक्षांमध्ये एखाद्याला तिकीट द्यावी लागते, निवडून येणे हाच निकष असतो. मी स्वतः अनेक फोन केलेत मेसेज केले. सर्वच पक्षाच्या नेत्यांशी मी बोललो आहे. भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यानंतर शैलेश टिळक नाराज असल्याचे बोलले जात होते. आज उमेदवारी अर्ज दाखल करतानादेखील शैलेश टिळक हे अनुपस्थित होते, तर भाजपतर्फे काढलेल्या रॅलीमध्येसुद्धा शैलेश टिळकांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली शैलेश टिळकांची भेट : प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज शैलेश टिळक यांच्या घरी येऊन त्यांची भेट घेतली, त्यावेळी बोलताना ते बोलत होते. शैलेश टिळक नाराज नाहीत, कुणालसुद्धा नाराज नाही, पक्षामध्ये असे होते. त्यामुळे नाराजीचा प्रश्नच नाही, परंतु जर महाविकास आघाडीकडून बिनविरोध निवडणूक होण्यासाठी टिळक परिवारांना तिकीट दिले तर करू, असे जर त्यांचे म्हणणे असेल तर उद्या हेमंत रासने आपल्या उमेदवारी अर्ज मागे घेतील. आम्ही कुटुंबातील व्यक्तींना तिकीट देऊ असे बावनकुळे यांनी सांगितले.
कसब्यामध्ये ब्राह्मण समाजावर अन्याय : कसब्यामध्ये ब्राह्मण समाजावर अन्याय होत असल्याचे बॅनर लागले आहेत. तत्पूर्वीच शैलेश टिळक यांनी कसब्यात ब्राह्मण समाजाला प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी केली होती. मात्र, भाजपने टिळक कुटुंबियांच्या बाहेर उमेदवारी देताना ब्राह्मण समाजाला प्रतिनिधित्व दिले नाही, असा आरोप करण्यात येत आहे. हे बॅनरसुद्धा जाणीवपूर्वक कोणी लावले हे आम्हाला माहिती आहे. मी बोलणार नाही, असे म्हणत त्यांनी एक प्रकारे विरोधकावर टीकासुद्धा यावेळी बावनकुळे यांनी केली.
कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये वेगळेच राजकारण : त्यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये वेगळेच काहीतरी घडणार असल्याची चर्चा होत आहे. कारण आज नाना पटोले यांनी गिरीश बापट यांचीसुद्धा भेट घेतलेली आहे. राजकीय परंपरा आहे आणि जर असे झाले आणि उद्या जर हेमंत रासने आपले उमेदवारी मागे घेतली आणि टिळक कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देण्याची शक्यता आहे.