ETV Bharat / state

गर्भवती पत्नीची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या; आरोपी पतीचा आत्महत्येचा प्रयत्न - पुणे बातमी

मृत पूजा ही पतीची तब्येत बरी नसल्याने औरंगाबाद येथून भेटण्यासाठी फुगेवाडी येथे आली होती. मात्र, अवघ्या पंधरा मिनिटात होत्याचे नव्हते झाले. मुलांसमोरच त्यांच्या आईचा खून पित्याने केला.

मृत पुजा घेवंदे
author img

By

Published : Aug 26, 2019, 12:03 AM IST

पुणे - गर्भवती पत्नीचा पतीने कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्याची घटना घडली आहे. पत्नीचा खून केल्यानंतर पतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पिंपरी-चिंचवड शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा घेवंदे (वय २५) असे मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर आरोपी पतीचे नाव प्रवीण घेवंदे (वय २८) आहे. त्याच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पतीने केला गर्भवती पत्नीचा कुऱ्हाडीने घाव घालून खून

मृत पूजा ही पतीची तब्येत बरी नसल्याने औरंगाबाद येथून भेटण्यासाठी फुगेवाडी येथे आली होती. मात्र, अवघ्या पंधरा मिनिटात होत्याचे नव्हते झाले. मुलांसमोरच त्यांच्या आईचा खून पित्याने केला. आरोपी प्रवीण हा गेल्या काही दिवसांपासून मनोरुग्णाप्रमाणे वागत होता. यामुळेच बाळांतपणासाठी गेलेली पूजा रविवारी प्रवीणला भेटण्यासाठी आली होती. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ती घरी आली. दोन्ही मुले तिला बिलगली होती. सर्वांसाठी चहा करण्यासाठी आतील रुममध्ये मुलांसह पूजा गेली. अचानक प्रवीण ने पाठीमागून मानेवर उलट्या कुऱ्हाडीने जबर प्रहार केला. यात पूजाचा जागीच मृत्यू झाला. हा सर्व थरार पोटच्या दोन्ही मुलांनी पाहिला. त्यानंतर स्वतः प्रवीणने धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो थोडक्यात बचावला असून त्याच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त आहे. घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत.

Intro:mh_pun_01_murder_av_mhc10002Body:mh_pun_01_murder_av_mhc10002

Anchor:- मुलांसमोरच गर्भवती पत्नीचा खून करून स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न पतीने केल्याची घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुजा घेवंदे वय-२५ असे मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव असून नराधम आरोपी पतीचे नाव प्रवीण घेवंदे-२८ असे आहे त्याच्या पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत पूजा ही पतीची तब्बेत ठीक नसल्याने औरंगाबाद येथून भेटण्यासाठी फुगेवाडी येथे आली होती. मात्र अवघ्या पंधरा मिनिटात होत्याच नव्हतं झालं आणि मुलांसमोरच त्यांच्या आईचा खून पित्याने केला. आरोपी प्रवीण हा गेल्या काही दिवसांपासून वेडसर पणा आल्यासारखं करत होता. यामुळेच बाळांतपणासाठी गेलेली पूजा आज प्रवीण ला भेटण्यासाठी आली होती. सायंकाळी पाच च्या सुमारास ती घरी आली, दोन्ही मुले तिला बिलगली होती. सर्वांसाठी चहा करण्यासाठी आतील रूममध्ये मुलांसह पूजा गेली. अचानक प्रवीण ने पाठीमागून मानेवर उलट्या कुऱ्हाडीने जबर प्रहार केला. यात पूजेचा जागीच मृत्यू झाला, हा सर्व थरार पोटच्या दोन्ही मुलांनी पाहिला. त्यानंतर स्वतः प्रवीण ने धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो थोडक्यात बचावला असून त्याच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त आहे. घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.