ETV Bharat / state

दिल्ली जळत असताना देशाचे गृहमंत्री झारखंडच्या प्रचारात व्यस्त - सुप्रिया सुळे

केंद्रातील सरकार कायम निवडणूक आणि प्रचारातच व्यस्त असते. त्यांना प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी वेळ नाही. त्यामुळे सर्वात आधी दिल्लीतील हिंसाचार थांबला पाहिजे. आंदोलन केल्यावर लाठीचार्ज होत असेल आणि महाविद्यालयात घुसून मारहाण होत असेल तर हे अतिशय दुर्दैवी आणि देशासाठी घातक आहे.

pune
दिल्ली जळत असताना देशाचे गृहमंत्री झारखंडच्या प्रचारात व्यस्त - सुप्रिया सुळे
author img

By

Published : Dec 16, 2019, 4:02 PM IST

पुणे - दिल्लीत कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली असताना गृहमंत्री अमित शाह झारखंडमध्ये प्रचार करत असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. दिल्लीतील परिस्थिती भयानक आहे. दिल्ली पोलीस केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली आहेत. गृहमंत्रालयाचे हे अजून एक अपयश आहे. दिल्लीतला प्रश्न गंभीर, आंदोलनं होत असताना, बस जळत असताना देशाची जबाबदार व्यक्ती झारखंडच्या प्रचारात व्यस्त आहे, असे सुळे म्हणाल्या. त्या पुण्यात एका बैठकीसाठी आल्या असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

दिल्ली जळत असताना देशाचे गृहमंत्री झारखंडच्या प्रचारात व्यस्त - सुप्रिया सुळे

हेही वाचा - अजित पवारांची क्रिकेटच्या मैदानातही दादागिरी...

सुळे म्हणाल्या, की केंद्रातील सरकार कायम निवडणूक आणि प्रचारातच व्यस्त असते. त्यांना प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी वेळ नाही. त्यामुळे सर्वात आधी दिल्लीतील हिंसाचार थांबला पाहिजे. आंदोलन केल्यावर लाठीचार्ज होत असेल आणि महाविद्यालयात घुसून मारहाण होत असेल तर हे अतिशय दुर्दैवी आणि देशासाठी घातक आहे.

हेही वाचा - पुणे जिल्ह्यात एटीएमची सुरक्षा रामभरोसे

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून सध्या देशात सुरू असलेल्या वादावर विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, देशासाठी ज्यांनी योगदान दिले त्या सर्वांबद्दल आमच्या मनात सन्मान आहे. त्यामुळे समाजात तेढ निर्माण होईल अशी भूमिका कोणीही घेऊच नये. देशासमोर सध्या बेरोजगारी हा गंभीर विषय आहे, त्यावर चर्चा होणे गरजेचे असल्याचेही त्या म्हणाल्या.

Intro:दिल्ली जळत असताना देशाचे गृहमंत्री झारखंडच्या प्रचारात व्यस्त - सुप्रिया सुळे

दिल्लीतील परिस्थिती भयानक आहे. दिल्ली पोलीस केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली आहेत. गृहमंत्रालयाचे गे अजून एक अपयश आहे. दिल्लीत गंभीर प्रश्न असताना, आंदोलनं होत असताना, बस जळत असताना देशाचे जबाबदार व्यक्ती गृहमंत्री झारखंडच्या प्रचारात व्यस्त असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. पुण्यात एका बैठकीसाठी आल्या असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सुळे म्हणाल्या, केंद्रातील सरकार कायम निवडणूक आणि प्रचारातच व्यस्त असते. त्यांना प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी वेळ नाही. त्यामुळे सर्वात आधी दिल्लीतील हिंसाचार थांबला पाहिजे. आंदोलन केल्यावर लाठीचार्ज होत असेल आणि महाविद्यालयात घुसून मारहाण होत असेल तर हे अतिशय दुर्दैवी आणि देशासाठी घातक आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून सध्या देशात सुरू असलेल्या वादावर विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, देशासाठी ज्यांनी योगदान दिले त्या सर्वांबद्दल आमच्या मनात सन्मान आहे. त्यामुळे ज्यामुळे समाजात तेढ निर्माण होईल अशी भूमिका कोणीही घेऊच नये. देशासमोर सध्या बेरोजगारी हा गंभीर विषय आहे त्यावर चर्चा होणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.
Body:।Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.