ETV Bharat / state

पिंपरीत वापरलेले वैद्यकीय साहित्य कचऱ्यात टाकले; आरोग्य विभागाने ठोठावला 25 हजारांचा दंड

चिखली परिसरात 'मेडिकल वेस्ट' टाकणाऱ्या सिद्धीविनायक रुग्णालयावर पंचवीस हजार रुपये दंडाची कारवाई क क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्या पथकाने केली आहे. चिखली येथील कुदळवाडी येथे असणाऱ्या कचराकुंडीत दवाखान्यात वापरण्यात आलेले इंजेक्शन आणि वैद्यकीय घातक कचरा टाकण्यात आल्याचे आढळून आले

पिंपरीत वापरलेले वैद्यकीय साहित्य कचऱ्यात टाकले; आरोग्य विभागाने ठोठावला 25 हजारांचा दंड
पिंपरीत वापरलेले वैद्यकीय साहित्य कचऱ्यात टाकले; आरोग्य विभागाने ठोठावला 25 हजारांचा दंड
author img

By

Published : Aug 23, 2020, 12:30 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवडच्या चिखली परिसरात खासगी रुग्णालयालने विनापरवाना वापरलेले इंजेक्शन्स आणि वैद्यकीय वापरातील घातक साहित्य कचरा कुंडीत टाकल्याचे आढळले आहे. या प्रकरणी सिद्धिविनायक रुग्णालयाला महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने 25 हजारांचा दंड केला आहे. ही कारवाई सहाय्यक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी की, चिखली परिसरात 'मेडिकल वेस्ट' टाकणाऱ्या सिद्धीविनायक रुग्णालयावर पंचवीस हजार रुपये दंडाची कारवाई क क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्या पथकाने केली आहे. चिखली येथील कुदळवाडी येथे असणाऱ्या कचराकुंडीत दवाखान्यात वापरण्यात आलेले इंजेक्शन आणि वैद्यकीय घातक कचरा टाकण्यात आल्याचे आढळून आले. त्यामध्ये असणाऱ्या कागदपत्रांच्या आधारे हा वैद्यकीय कचरा सिद्धीविनायक रुग्णालयाचा असल्याचे तपासणीत आढळून आले.

आकुर्डी रुग्णालयाच्या प्रमुख डाॅ. सुनिता साळवी यांनी प्रत्यक्ष कचरा कुंडीत टाकण्यात आलेल्या कचऱ्याची पाहणी केली व त्यानंतर मोशी रस्त्यावरील या रुग्णालयात जावून तपासणी केली असता, त्यांच्याकडे महानगरपालिकेकडील वैद्यकीय कचऱ्याची परवानगी नसल्याचे आढळून आले. सदर रुग्णालयाने रस्त्यावर कचरा टाकल्याने या रुग्णालयाचे प्रमुख डाॅ. परिक्षित फेंगडे यांच्यावर पंचवीस हजार रुपये दंडाची कारवाई सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केली.

सदरची कारवाई सहाय्यक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक आरोग्य अधिकारी बी. बी. कांबळे, आरोग्य निरीक्षक विजय दवाळे, वैभव कांचनगौडार यांच्या पथकाने केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.