ETV Bharat / state

Girish Mahajan On Sambhaji Nagar Dangal : जाणीवपूर्वक विरोधकांकडून दंगल घडवण्याचा प्रयत्न - गिरीश महाजन - Girish Mahajan On Dangal

औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर केल्याने काही लोकांच्या पोटात गोळा आला आहे. त्यामुळे विरोधक दंगल घडवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते, संजय राऊत यांच्यावरही त्यांनी टीकास्त्र सोडले आहे. ते आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत होते.

Girish Mahajan
Girish Mahajan
author img

By

Published : Mar 31, 2023, 4:06 PM IST

विरोधकांकडून दंगल घडवण्याचा प्रयत्न - गिरीश महाजन

पुणे : संभाजीनगरची परिस्थिती गंभीर आहे. याची आम्हाला जाणीव आहे. परंतु, संभाजीनगर नाव दिल्याने काही लोकांच्या मनामध्ये पोटशुळ उठला आहे. त्यामुळे विरोधक सरकारवर आरोप करीत आहेत. दंगल घडवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न स्वतःच करायचे अन आरोप सरकारवर करायचा सपाटा विरोधकांनी लावल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी विरोधकावर केला आहे. तसेच शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे. गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस असताना कधीही दंगल झाली नाही. सरकारने संभाजीनगरचे रिपोर्ट घेतलेले आहेत. तिथले सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले आहेत. त्यांच्यावर कार्यवाही सुद्धा होणार आहे. त्यामुळे चुकीचे आरोप करणे थांबवले पाहिजे. हिंदू सण सर्वांनी एकत्र येत साजरे केले पाहिजे, असे देखील गिरीश महाजन म्हणाले.

सभेसंदर्भात प्रशासन निर्णय घेणार : वीर सावरकर यात्रा तसेच उद्धव ठाकरेंची संभाजीनगरमध्ये होणारी सभा यासंदर्भात प्रशासन निर्णय घेईल. प्रशासनात जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांचा समावेश आहे. ते त्या ठिकाणची परिस्थिती पाहतील, दंगल झाली खरे आहे. मात्र, अशा परिस्थितीत सभा घेणे योग्य आहे की, आयोग्य ते प्रशासन ठरवेल असे महाजन म्हणाले.

राऊतांच्या जिभेला हाड नाही : संजय राऊत यांच्या जिभेला हाड नाही. ते कुणावरही बोलतात, निवडणूक आयोगावर बोलतात, सर्वोच्च न्यायालयावर बोलतात, ते कुणावरही बोलू शकतात. परंतु संभाजीनगरमध्ये काय झाले हे सर्वांना माहीत आहे. ज्यावेळेस नामांतर झाले, त्यावेळेस संजय राऊत किती नाराज झाले हे मला माहीत आहे. त्यामुळे आता मुद्दामहून आपली वोट बँक सेट करण्यासाठी दंगल आम्ही केली असा आरोप करत असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. दरम्यान, गिरीश महाजन यांनी आज भाजपाचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबाची भेट घेतली आहे. त्यांनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा - Supriya Sule on CM Shinde : सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल; सत्ताधारी आमदाराला पाठिशी घालताय काय?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.