पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Bharat Ratna Babasaheb Ambedkar ) यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीमध्ये महापरिनिर्वाण झाले. (Mahaparinirvana took place in Delhi ) संपूर्ण भारतावर दुःखाचा डोंगर कोसळला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक, लेखक, पत्रकार असे व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आहेत. इतकच नव्हे तर त्यांना भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणूनही ओळखले जाते. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला हजारो भाविकांनी देशभर तसेच राज्यभर विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पारगांव येथे राजेंद्र विष्णू शिशुपाल यांनी आपल्या स्वतच्या घरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 फुटी पुतळा उभारला असून बाबासाहेब आंबेडकरांचा विचार लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी ही कलाकृती उभारली आहे.
6 फुटी पुतळा उभारलेला : दौंड येथील पारगाव चे माजी सरपंच राजेंद्र विष्णू शिशुपाल यांनी नव्याने बांधलेल्या स्वतःच्या दुमजली घराला त्यांनी क्रांतिसूर्य नाव दिले आहे. आणि याच घराच्या टेरेसवर त्यांनी 2 वर्षापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 फुटी पुतळा उभारलेला आहे. हा सहा फूट उंचीचा पुतळा खूपच आकर्षक दिसत आहे. हा पुतळा सर्वानाच आकर्षण ठरत आहे.
संविधान दिनादिवशी या पुतळ्याची विशेष पूजा : डॉ. आंबेडकर यांच्याप्रति असणारा आदर, त्यांचा असणारा विचार, त्यांनी शिक्षणाप्रती दिलेली प्रेरणा आणि समाजाप्रती दिलेली भावना यातून या पुतळ्याची उभारणी करण्याचा निर्णय घेतला. माझ्या या निर्णयाला कुटुंबाने देखील साथ दिली. प्रत्येक वर्षी पुण्यतिथी व संविधान दिनादिवशी या पुतळ्याची विशेष पूजा केली जाते. डॉ. आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन राजेंद्र शिशुपाल यांनी शब्द भेट साहित्य सेवा संघाची स्थापना देखील केली आहे. शिशुपाल हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून, उत्कृष्ट कवीदेखील आहेत. स्वतः लिहिलेली सात पुस्तके त्यांनी प्रसिद्ध केली आहेत. तसेच शिशुपाल यांचे कुटुंब उच्चशिक्षित आहे. त्यांची दोन्ही मुले प्रशांत व प्रसाद हे प्राध्यापक असून, मुलगी प्रतीक्षा डी. एड. झाली आहे. दोन्ही सुनाही उच्चशिक्षित आहेत.
हुबेहूब वेशभूषा केलेला पुतळा : सोनेरी रंगाचा असणारा, अंगावर कोट, पॅन्ट, हातात पुस्तक व चष्मा अशी वेशभूषा केलेला हा पुतळा हुबेहूब दिसत आहे. पुणे येथील एका कारागिराकडून त्यांनी हा पुतळा बनवून घेतल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. हा पुतळा उभारणीसाठी किती खर्च आला याबाबत ते कधीही लोकांना सांगत नाहीत. कारण या मानवाची किंमत होऊच शकत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. प्रत्येक सणासुदीच्या काळात शिशुपाल यांचे कुटुंबीय त्यांची मनोभावे पूजा करतात.