ETV Bharat / state

अक्षय्य तृतीया विशेष : माऊलींच्या मंदिरात चंदन उटीच्या साहाय्याने रेखाटली विठुरायाची मूर्ती - mauli temple decoraion alandi pune

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेदिवशी आळंदीच्या माऊलींच्या गाभाऱ्यात व परिसरात फुलांचा सुगंध सर्वत्र दरवळला. प्रत्येक सणानिमित्त माऊलींच्या गाभाऱ्याला फुलांची सजावट केली जाते.

mauli temple alandi
संत ज्ञानेश्वर मंदिर आळंदी
author img

By

Published : May 14, 2021, 8:14 PM IST

Updated : May 14, 2021, 9:04 PM IST

आळंदी (पुणे) - अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात चंदन उटीच्या साहाय्याने माऊलींच्या समाधीवरती सावळ्या विठुरायाची मूर्ती रेखाटण्यात आली. तसेच विना मंडपात व समाधी मंदिरात मोगरा व इतर रंगेबिरंगी फुलांनी अक्षय्य तृतीयेनिमित्त खास सजवण्यात आले आहे.

ज्ञानोबा माऊलींच्या मंदिरातील मनमोहक दृश्ये

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेदिवशी आळंदीच्या माऊलींच्या गाभाऱ्यात व परिसरात फुलांचा सुगंध सर्वत्र दरवळला. प्रत्येक सणानिमित्त माऊलींच्या गाभाऱ्याला फुलांची सजावट केली जाते. मात्र, आज (शुक्रवारी) आकर्षक फुलांमध्ये आणि चंदन उटीमध्ये सावळा विठ्ठल जणू काही आपल्या भक्ताला भेटण्यासाठी आळंदीला आला आहे, इतके विलोभनीय दृश्य पाहायला मिळाले.

हेही वाचा - आमराईत नटली विठु-रखुमाई; गाभाऱ्यात 6500 हापूस आंब्यांची मनमोहक आरास

माऊलींच्या मंदिरात केलेली ही सजावट पाहण्यासाठी दरवर्षी असंख्य भाविक याठिकाणी दाखल होतात. मात्र, यावर्षी कोरोनाचे सावट असल्यामुळे यंदा भाविकांना घरातूनच दर्शन घ्यावं लागतंय. देवस्थाने बंद आहेत. मात्र, मंदिरांमध्ये पूजा, आरास अशा विधी नित्यनेमाने सुरू आहेत.

Last Updated : May 14, 2021, 9:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.