ETV Bharat / state

Pune Accident News: पुणे-नाशिक महामार्गावर चारचाकी वाहनाने महिलांच्या घोळक्याला उडवले; पाच महिलांचा जागीच मृत्यू, 5 पेक्षा अधिक जखमी - चांडोली ग्रामीण रुग्णालय

पुणे-नाशिक महामार्गावर असणाऱ्या खेड तालुक्यातील शिरोली गावाजवळ सोमवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. पुण्याकडून येणाऱ्या चारचाकी वाहनाने महिलांच्या घोळक्याला उडवले. या अपघातात पाच महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. 5 पेक्षा अधिक महिला जखमी झाल्या आहेत.

Pune Accident News
पुणे नाशिक महामार्गावर अपघात
author img

By

Published : Feb 14, 2023, 8:51 AM IST

Updated : Feb 14, 2023, 10:06 AM IST

पुणे : पुणे नाशिक महामार्गावर अपघाताचे सत्र काही थांबता थांबेना. खेड तालुक्यातील शिरोली गावाजवळ सोमवारी रात्री भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. खरापुडी फाट्याजवळ हा अपघात झाला आहे. या घोळक्यात १७ महिला होत्या. सुशीला देढे, इंदुबाई कोंडीबा कांबळे ( वय ४६) अशी मृत महिलांची नावे आहेत. अन्य मृत महिलांची नावे समजू शकली नाहीत. अन्य जखमी महिलांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू : पोलिसांनी तातडीने मदत पुरवल्याने महिलांना लवकर उपचार मिळाले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. पोलीस व प्रशासकीय यंत्रणाशी तातडीने संपर्क करुन जखमी महिलांना स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात दाखल केले. चांडोली ग्रामीण रुग्णालयासह राजगुरूनगर परिसरातील चार ते पाच खासगी रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर चांडोली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.

वाहनाने घोळक्याला जोरात धडक दिली : पुणे नाशिक रस्त्यावर असलेल्या खरपुडी गळ्यावर असणाऱ्या मंगल कार्यालयात या १७ महिला लग्न कार्यक्रमात वाढपी आणि स्वयंपाक कामासाठी आल्या होत्या. पुण्याच्या वेगवेगळ्या भागातून या महिला आल्या होत्या. मंगल कार्यालय दुसऱ्या बाजूला असल्याने त्या सर्वजणी रस्ता क्रॉस करत होत्या. मात्र पुण्याच्या दिशेने आलेल्या एका भरधाव चारचाकी वाहनाने घोळक्याला जोरात धडक दिली. या मोठा आवाज झाल्याने महिलांचा आरडा ओरडा सुरू झाला. रात्रीच्या वेळी पोलिस जात असताना प्रकार समोर आला. यात पाच महिलांचा मृत्यू झाला असून 5 पेक्षा अधिक महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

4 फेब्रुवारीची घटना : बेल्हा जेजरी मार्गावर धामारी परिसरात शुक्रवारी रात्री सातच्या सुमारास भीषण अपघातात मायलेकांचा आणि एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. धामारी येथील खंडोबा मंदिराच्या जवळली वळणावर शिक्रापूरच्या बाजूने आलेल्या एम. एच. १४ जि. यु. ६८८० या टेम्पोची डोके याच्या गाडीला जोरदार धडक दिली होती. त्यामुळे हा भीषण अपघात झाला होता. या अपघातात दिलीप डोके वय २० वर्षे, विजया दिलीप डोके वय ४५ वर्षे, या माय लेकांसह ओंकार चंद्रकांत सुक्रे वय २० वर्षे तिघे राहणार खडकवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

हेही वाचा : Durg Police Arrested Thief : छत्तीसगडमध्ये 3 कोटीचा दरोडा; दुर्ग पोलिसांनी नागपूरच्या आरोपीच्या गोव्यातून आवळल्या मुसक्या

Last Updated : Feb 14, 2023, 10:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.