ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये बुधवारी आढळले ५ नवीन कोरोनाबाधित, ५ जणांना डिस्चार्ज - 5 corona patients discharge in pcmc

पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी दिवसभरात ५ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. हे सर्व रुग्ण चिंचवड स्टेशन, भोसरी, दिघी, रहाटणी या परिसरातील रहिवासी असून पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर, डिस्चार्ज झालेले व्यक्ती हे पिंपळेगुरव, मोशी आणि इतर ठिकाणचे आहेत.

corona in pcmc
पिंपरी-चिंचवडमध्ये बुधवारी आढळले ५ नवीन कोरोनाबाधित
author img

By

Published : May 14, 2020, 11:54 AM IST

पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये बुधवारी दिवसभरात ५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून एकूण संख्या १७९ वर पोहचली आहे. तर, ५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींची आकडेवारी ११६ झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात आणि शहराबाहेरील एकूण ९ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. दिवसेंदिवस वाढणारी आकडेवारी ही चिंता वाढवणारी आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी दिवसभरात ५ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. हे सर्व रुग्ण चिंचवड स्टेशन, भोसरी, दिघी, रहाटणी या परिसरातील रहिवासी असून पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर, डिस्चार्ज झालेले व्यक्ती हे पिंपळेगुरव, मोशी आणि इतर ठिकाणचे आहेत.

बुधवारी मध्यरात्री सील करण्यात येणारे परिसर खालीलप्रमाणे

छत्रपती चौक, रहाटणी (श्रीनंदा क्लासिक सिध्दीविनायक मंदिर–रेणुका माता मंदिर–बसेरा रेसिडन्सी–ओंम मेडिकल स्टोअर–जीवन क्लिनिक–छत्रपती चौक -श्रीनंदा क्लासिक ) आनंदनगर, चिंचवड स्टेशन (चिंचवड स्टेशन रोड–स्टार बेस्ट बेकरी–जुना मुंबई पुणे हायवे–सदगुरु स्नॅक्स–कार्निव्हल सिनेमा मागची बाजू– प्रिमियर कंपनी मागील बाजू, मालधक्का भिंत, मालधक्का रोड, चिंचवड स्टेशन रोड) परिसर बुधवारी मध्यरात्रीपासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येत आहेत.

सदर परिसराच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केलेली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.