पुणे - श्रावण महिना म्हटलं की व्रतवैकल्याचा म्हणून महत्त्वाचा मानला जातो, तो पहिला श्रावणी सोमवार. आज पहिल्या श्रावणी सोमवार यानिमित्ताने आम्ही तुम्हाला आमच्या माध्यमातून दर्शन घडवणार आहोत. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर या शिवलिंगाची स्थापना, भीमा नावाच्या दैत्याचा वध केल्यानंतर करण्यात आली. याच भीमाशंकराचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करू लागले आहेत.
हर हर महादेव, ओम नमः शिवाय.! करत आजपासून सुरू झालेली ही श्रावण महिन्यातील यात्रा भीमाशंकर चरणी येणार्या प्रत्येक भाविकाला सुखमय व्हावी यासाठी प्रत्येक भाविक शिवलिंगावर बेल फुल वाहत मोठ्या भक्तिभावाने पूजा अभिषेक करत आहेत.
सह्याद्री पर्वत रांगांच्या कुशीत वसलेले हे भीमाशंकर देवस्थान बारा ज्योतिर्लिंगांपैकी आणि महाराष्ट्रात असलेल्या पाच ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. हिरव्यागार वातावरणात पांढरीशुभ्र धुक्याची चादर वेढलेला हा परिसर रिमझिम पावसात न्याहाळून गेला आहे. याच वातावरणात भाविकांच्या लांब रांगा आज पहाटेपासूनच लागल्या असून याठिकाणी येणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागू नये, यासाठी पोलीस दल तैनात आहे.
भीमाशंकरला दाक्कीण्याम भीमाशंकरम या नावानेही ओळखले जाते. हे अनाधी काळापासून स्वयंभू असल्याची अख्यायिका सांगितली जाते. त्रेतायुगात त्रीपुरसुर नावाचा एक राजा होता. त्याने भगवान शंकराला प्रसन्न करून वरदान मागितले होते. शंकरानेही त्याला नारी (स्त्री) किंवा नर (पुरूष) यांपैकी कोणीही मारू शकणार नाही, असे वरदान दिले. त्यानंतर तो खूप उन्मत्त होऊन सगळ्यांना त्रास देऊ लागला. त्यानंतर त्याचा वध करण्यासाठी भगवान शंकराने अर्धनारी नटेश्वराचे रूप धारण केले आणि त्याचा वध केला. त्यानंतर महादेवाच्या शिवलिंगाची स्थापना भीमाशंकर येथे करण्यात आली.
जाती-धर्माच्या सीमा पार करत देशभरातून भाविक भक्त भीमाशंकरला दाखल होतात. प्रशासन व देवस्थान यांच्याकडून भाविकांसाठी योग्य त्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातून भीमाशंकराचा हा परिसर पांढऱ्या शुभ्र धुक्यात थंडगार वातावरणात निहाळून गेल्यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्तांचे मन प्रसन्न करून जातो.
देशभरातून येणाऱ्या प्रत्येक भाविक श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी मोठ्या भक्तिभावाने शिवलिंगाचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास करतो. मात्र, या नयनरम्य भीमाशंकर परिसराचा मनमुक्त आनंद घेऊनच पुढे जात असतो.