पुणे Pandit Nehru Birth Anniversary: पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित छायाचित्र प्रदर्शन (Nehru Photos Exhibition) पुण्यातील बाळासाहेब ठाकरे कलादालनात (Balasaheb Thackeray Kaladalan) भरविण्यात आलं आहे. आज या प्रदर्शनाचं उदघाटन डॉ. विश्वंभर चौधरी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. अभय छाजेड तसंच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
छायाचित्र प्रदर्शनातू दाखवले कार्य : या प्रदर्शनात पंडित नेहरु यांच्या बालपणापासून ते पंतप्रधान पदातील विविध कारकीर्दीतील छायाचित्रे लावण्यात आली आहेत. या प्रदर्शनात नेहरुंच्या छायाचित्र प्रदर्शनातू त्यांचे विचार, सामाजिक कार्य, कृषी, अर्थ, हरितक्रांती विविध विकास कामांची माहिती, तसंच त्यांच्या आवडीच्या लहान मुलांन बरोबरची छायाचित्रं प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.
लोकशाही रुजवण्याचं केलं काम : पंडित जवाहरलाल नेहरु यांनी खऱ्या अर्थाने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे. देशात आज जी लोकशाही आहे ती लोकशाही रुजवण्याचं कठीण काम नेहरू यांनी केलं आहे. लोकशाही घट्ट करण्याचं काम त्यांनी केलं. जनमानसावर पंडित नेहरुंचा खूप मोठा प्रभाव होता. नेहरुंनी लोकशाही परंपरा आणि प्रथा जपल्या. आज या प्रदर्शनातून पुढील पिढीला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याची माहिती व्हावी, या उद्देशाने हे छायाचित्र प्रदर्शन लावण्यात आलं असल्याचं यावेळी आयोजक अभय छाजेड यांनी सांगितलं.
लोकशाहीची पहिली निवडणूक नेहरुंच्या काळात : सध्या देशात काही घटकांकडून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांचं विद्रुपीकरण करण्याचं काम केलं जातं आहे. ज्या लोकांचं देशहित आणि स्वातंत्र्यासाठी कणभरही काम नाही अशा लोकांकडून नेहरुंच्या विचारांचं विद्रुपीकरण होत आहे. त्यांच्या बाबतीत काहीही बोललं जातं आहे. अशा लोकांनी आज या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि त्यांना त्यांच्याच प्रश्नाची उत्तर यातून मिळणार आहेत. देशात लोकशाहीची पहिली निवडणूक नेहरुंच्या काळात झाली. लोकशाहीचा पाया त्यांनी रचला. त्यांची लोकमानसात प्रचंड लोकप्रियात होती.असं यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी सांगितलं.
हेही वाचा -