ETV Bharat / state

जुनी सांगवीत तरुणावर गोळीबार, कारण अस्पष्ट - जुनी सांगवीत तरुणावर गोळीबार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री अकराच्या सुमारास जुनी सांगवी येथील शितोळे पेट्रोल पंपाच्या परिसरात आनंद, पत्नी आणि शेजाऱ्याची लहान तीन वर्षीय मुलगी असे तिघे जण बाहेर फिरण्यासाठी आले होते. पायी चालत जात असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात व्यक्तीने जवळून पिस्तूलातून आनंदच्या दिशेने गोळी झाडली.

firing on youth in old sangvi
जुनी सांगवीत तरुणावर गोळीबार, कारण अस्पष्ट
author img

By

Published : Jan 10, 2021, 1:41 AM IST

पुणे - जुनी सांगवी येथे पत्नी आणि लहान मुलीसोबत बाहेर फिरण्यासाठी आलेल्या एका तरुणावर अज्ञात व्यक्तीने पिस्तूलातून गोळीबार केला आहे. या घटनेत तरुण गंभीर असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आनंद ललीतकुमार सोलंकी (वय-30 रा. जुनी सांगवी) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पाठीमागून येऊन गोळीबार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री अकराच्या सुमारास जुनी सांगवी येथील शितोळे पेट्रोल पंपाच्या परिसरात आनंद, पत्नी आणि शेजाऱ्याची लहान तीन वर्षीय मुलगी असे तिघे जण बाहेर फिरण्यासाठी आले होते. पायी चालत जात असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात व्यक्तीने जवळून पिस्तूलातून आनंदच्या दिशेने गोळी झाडली. यात आनंदच्या मानेला आणि कानाला गोळी लागली असून गंभीर दुखापत झाली आहे.

अद्याप आरोपी मोकाट; घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांची भेट

गोळीबार करण्याचे कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकलेले नाही. सांगवी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्तालयाचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, गुन्हे पोलीस निरीक्षक अजय भोसले यांनी घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा - बहिणीच्या लग्नासाठी फटाके आणायला गेलेल्या भावाचा अपघातात मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.