पुणे - हॉटेलमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात मांजरी येथील माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. चंद्रकांत घुळे, संजय शेडगे आणि त्यांच्या साथीदाराबरोबर माजी सरपंच्याचे किरकोळ भांडण झाले. भांडणाचा बदला घेण्यासाठी दुसऱ्या साथीदाराला बोलावून माजी सरपंचावर गोळीबार केला. तसेच दगड विटांनी त्यांच्या डोक्यावर हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. गोळीबारात ते बजावले असले तरी त्यांच्या डोक्याला जबर मारहाण झालेली आहे.
साथीदारांना बोलवून केली मारहाण - पुरुषोत्तम ऊर्फ अण्णा धारवडकर असे मांजरी येथील माजी सरपंचाचे नाव आहे. धारवडकर काल रात्री नऊच्या सुमारास श्रीराम हॉटेलमध्ये आपल्या काही साथीदारांसोबत जेवण्यासाठी आले होते. हॉटेलमध्ये टेबलावर बसलेल्या संजय झुरुंगे आणि चंद्रकांत घुले यांच्याबरोबर त्यांचे भांडण झाले. भांडणानंतर घुले यांनी आपल्या काही साथीदारांना बोलावून घेतले. जेवण संपून जेव्हा धारवाडकर हॉटेलबाहेर पडत होते, तेव्हा घुले यांच्या तीन साथीदारांनी धारवाडकर यांच्यावर गोळीबार केला. मात्र हा गोळीबार धारवाडकर यांनी चुकवला. त्यानंतर त्यांच्यावर दगड, विटा फेकून मारण्यात आल्या. त्यामुळे धारवाडकर जखमी होऊन रस्त्यावर पडले.
हेही वाचा - Koregaon Bhima Commission : कोरेगाव-भीमा चौकशी आयोगासमोर साक्ष नोंदवण्यासाठी शरद पवार सह्याद्रीवर
आरोपींनी काढला पळ - धारवाडकर यांना कोणी मदत केली तर त्यांची देखील अशीच परिस्थिती करू, अशी धमकी त्यांनी इतरांना दिली आणि पळ काढला. धारवाडकर यांना तातडीने नोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या डोक्याला आठ टक्के पडले. तसेच त्यांची तब्येतीत सुधारणा होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेत दरम्यान हडपसर पोलिसांनी नंदू शेडगे, चंद्रकांत घुले आणि त्यांच्या तीन साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना काल रात्रीच्या सुमारास रात्री नऊ वाजता मांजरी येथील श्रीराम हॉटेलमध्ये घडली.