पुणे : गॅस पाईपलाईन फुटल्यानंतर अग्निशमन दलाची ३ वाहने आग विझवण्याचे काम करीत होते. तसेच एमएनजीएलचे कर्मचारीही दाखल झाले होते. पाईपमधून गॅसचा प्रवाह सुरु असल्याने आग आटोक्यात येत नव्हती. या घटनेमुळे मध्यरात्री सिंहगड रोडवरील या भागातील एका बाजुची वाहतूक थांबवण्यात आली होती. दुसऱ्या बाजूने वाहने जात होती. अचानक गॅसची पाईपलाईन फुटल्याने ही आग लागल्याची घटना सिंहगड रोडवरील राजाराम पुलाजवळ घडली.
अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न : मध्यराञी 12:10 वाजता सिहंगड रस्ता राजाराम पुलावर लागलेली आग पहाटेच्या सुमारास आटोक्यात आली आहे. तिथेच आजूबाजूला ३ ठिकाणी आग पसरल्याने आग विझवण्याचे अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न केले. अग्निशामक दलाचे मुख्य अधिकारी व कर्मचारी दाखल होऊन त्यांनी संबंधित विविध लाईन बंद करून आग आटोक्यात आणली आहे.
15 आॉक्टोबर रोजी पुण्यात बर्निंग कारचा थरार : पुण्यातील येरवडा येथील गोल्फ क्लब रस्ता औद्योगिक शाळेसमोर एका चारचाकी वाहनाला आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. येरवडा येथे काल रात्री 9 वाजताच्या सुमारास ही आग लागली होती. यावेळी अग्निशामक दलातील जवानांनी होजरीलच्या साह्याने पाण्याचा मारा करत आग पुर्ण विझवली. हे वाहन टाटा कंपनीच्या नेक्सॉन या मॉडलचे होते. वाहनाने पेट घेतला होता त्यावेळी वाहनामध्ये पाच व्यक्ती प्रवास करत होते. आगीचे नेमके कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. या कामगिरीत येरवडा अग्निशमन केंद्र अधिकारी सुभाष जाधव, वाहनचालक सुनिल धुमाळ, फायरमन उत्तम खांडेभराड, सुनिल खराबी व मदतनीस अक्षय तरटे, अक्षय पवार यांनी सहभाग घेतला होता.
22 आॉक्टोबर रोजी सदाशिव पेठेतील हॉटेलला लागली आग : पुण्यातील सदाशिव पेठेतील भिकारदास मारुतीजवळील एका हॉटेलला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांसह अग्निशमन दलाच्या 3 गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळावरून 3 सिलिंडर काढले. तसेच आगीत अडकलेल्या सहा वर्षांच्या मुलीला जवानांनी बाहेर काढले. जखमी अवस्थेत मुलीला अग्निशमन दलाच्या वाहनातून जवळच्या सूर्या सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने रुग्णालयात उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला.
20 एप्रिल रोजी पुण्यात दुकानांना भीषण आग, 12 दुकाने जळून खाक : पुण्यातील खराडी, उबाळे नगर, महालक्ष्मी लॉन्स समोरील दुकानांना आग लागली होती. घटनास्थळी पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाची एकूण 6 वाहने दाखल झाली होती. ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्नीशमन दलाच्या जवानांनी केले. आग का लागली याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. पहिल्यांदा आग ही फक्त 2 ते 3 दुकानांना लागली होती. त्यानंतर परिसरातील 12 दुकाने ही आगीत जळाली. दुकाने जळाल्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आगीत कोणीतीही जीवितहानी झालेली नाही. आगीत 12 विविध प्रकारची दुकाने जळाली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली असून कुलिंग देखील करण्यात आले आहे. आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
हेही वाचा : नाना पेठ येथे गोडाऊनला आग, 4 जण किरकोळ जखमी