पुणे : पुण्यात आग लागण्याच्या घटना सुरूच आहेत. काही दिवसापूर्वीच मार्केट यार्ड मधील टिंबर मार्केट येथील काही दुकानांमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली होती. साधरण 5-6 दिवसानंतर आज पुन्हा मार्केट यार्डमधील रद्दीच्या गोडाऊनला आग लागली. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. मार्केटयार्ड गोल मार्केट येथील एका गोडाऊनमधे आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणीही जखमी किंवा कोणतीच जीवितहानी झालेली नाही. दरम्यान अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली आहे.
आग लागल्याची घटना कधी घडली : याबाबत अधिक माहिती अशी की, आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अंदाजे 500 स्क्वे.फुटच्या गोडाऊनमध्ये कागद रद्दी आणि काही प्रमाणात पुठ्ठ्याचा माल होता. या रद्दीच्या मालाला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने गोडाऊनचे मुख्य दरवाजावर लावण्यात आलेले कुलूप बोल्ड कटरच्या साह्याने तोडण्यात आले. आग लागलेल्या रद्दीवर चहूबाजूंने पाण्याचा मारा करण्यात आला आणि आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. आग मोठी असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी अतिरिक्त मदतीसाठी इतर ठिकणच्या अग्निशमन वाहनांना पाचारण केले.
आगीत दोन वाहने जळाली : शेजारी रहिवाशी इमारत असल्याने आग त्या दिशेला पसरू नये याची विषेश खबरदारी घेत पाण्याचा मारा सुरू ठेवण्यात आला. सुमारे तासाभरानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. यावेळी गोडाऊनमध्ये असलेले रद्दीचे कागद पूर्णपणे खाक झाले आहे. गोडाऊनमध्ये असलेले दोन टेम्पो ही या आगीत भस्म झाले आहेत. दरम्यान ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. दोन दिवसापूर्वीच टिंबर मार्केट येथे सुद्धा अशीच एक फर्निचरच्या दुकानाला आग लागून खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे वाढत्या शहरीकरणांमध्ये आणि उन्हाची तीव्रता वाढली असताना आग लागण्याचे प्रमाण सध्या वाढत आहे.
हेही वाचा -
1.टिंबर मार्केट येथे लाकूड सामान असलेल्या गोडाऊनला लागली भीषण आग
2.Jalna Fire : जालना शहरातील जुन्या टायरच्या गोडाऊनला लागली भीषण आग