पुणे - कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह देऊन आर्थीक लूट करण्याचा प्रकार पुणे जिल्ह्यातील आळेफाटा आरोग्य केंद्रात समोर आला आहे. येथील कर्मचारीच कोरोना रुग्णांना उपचार करून देण्यासाठी 40 हजार रुपये घेत असून याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेड आणि उपचार करण्यासाठी चक्क 40 हजार -
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आळेफाटा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी कोरोनाचे चाचणी अहवाल स्वतः तयार करून बाधित रुग्णाला इतर रुग्णालयात बेड आणि उपचार करून देतो असे सांगत चक्क 40 हजार रुपये घेत होते. नागरिकांच्या सतर्कतेने हा संपूर्ण प्रकारसमोर आला आहे. आता याला याप्रकरणी कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
उपचार करून देण्यासाठी पैसे घेतले -
कोरोनाच्या वाईट काळात, मदतीची अपेक्षा जनता करताना हा सरकारी बाबू मात्र अडचणीचा फायदा घेवून मढ्यावरचं लोणी खात आहेत. याची गंभीर दखल प्रशासनाने घ्यावी, अमोल पवार या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईक करीत आहेत, याबाबत त्याच्यावर आळेफाटा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून या कर्मचाऱ्यांने अजून अनेक जणांकडून उपचार करून देण्यासाठी पैसे घेतले असल्याचे समोर येत आहे, हे मोठं रॅकेट आहे का याचाही तपास आळेफाटा पोलीस करीत आहे.
हेही वाचा - Cyclone Tauktae : मुंबापुरीला चक्रीवादळाचा तडाखा.. मुसळधार पावसाने मुंबई 'स्लो ट्रॅक'वर