पुणे - धुळवडीला रंग खेळताना दोन गटात हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या हाणामारीत रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांची तोडफोड देखील करण्यात आली. ही घटना चतुःशृंगी परिसरातील खैरेवाडीमध्ये घडली आहे. हा सर्व प्रकार परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
माहितीनुसार, पुण्यात धुळवडीला रंग खेळताना दोन गटात झालेल्या वादावादीतून गाड्यांची तोडफोड करण्यात आली. चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खैरेवाडी येथे आज(मंगळवारी) सकाळी ही घटना घडली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून यात काही तरुण एकमेकांचा पाठलाग करत दगडफेक करताना दिसत आहेत. पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा - 'कोरोना बाधित 2 रुग्ण 'नायडू'मध्ये दाखल, प्रशासनाकडून विविध उपाय योजना'
या सीसीटीव्हीमध्ये सुरुवातीला एका गटातील काही तरुण दगडफेक करताना दिसत आहेत. यामध्ये रस्त्यावर पार्क केलेल्या काही वाहनांचे नुकसानही झाले आहे. त्यानंतर दुसऱ्या गटातील काही तरुण लाठ्याकाठ्या घेऊन या तरुणांचा पाठलाग करताना दिसत आहेत. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.
हेही वाचा - कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज; आजारी व्यक्तींना प्रवास टाळण्याचे आवाहन