ETV Bharat / state

दौंड; वाटलुज येथे शेतकऱ्याची आत्महत्या

author img

By

Published : Jan 31, 2021, 8:22 AM IST

प्रमोद यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्ज घेतले होते. कर्ज परत फेडीसाठी प्रमोद यांना नोटीस आली होती. त्यामुळे ते तणावात हेते आणि तणावाखाली त्यांनी आत्महत्या केली असावी असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दौंड;  वाटलुज येथे शेतकऱ्याची आत्महत्या
दौंड; वाटलुज येथे शेतकऱ्याची आत्महत्या

पुणे- दौंड तालुक्यातील वाटलुज येथे एका शेतकऱ्याने पोल्ट्री शेडमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रमोद शंकर कदम (४५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. प्रमोद यांना कर्ज फेडण्यासाठी बँकेची नोटीस आल्यामुळे ते तणावात होते म्हणून त्यांनी आत्महत्या केली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

पोल्ट्री शेडमध्ये गळफास

गावातीलच संतोष येळे यांनी प्रमोद यांना आत्महत्या केलेल्या अवस्थेत बघितले प्रमोद यांचे भाऊ सत्यविजय यांना याबाबत माहिती दिला. त्यांनंतर सत्यविजय यांनी घटनास्थळी धाव घेत प्रमोद यांना खाली उतरवले मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता.

अधिक तपास सुरु

प्रमोद यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्ज घेतले होते. कर्ज परत फेडीसाठी प्रमोद यांना नोटीस आली होती. त्यामुळे ते तणावात हेते आणि तणावाखाली त्यांनी आत्महत्या केली असावी असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दौंड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी हे करत आहेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.