ETV Bharat / state

बीज प्रक्रिया आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरामुळे कांद्याचे उत्पादन वाढण्यास मदत - डॉ. राजीव काळे - पुणे लेटेस्ट न्यूज

कांदा लागवडीवेळी कांदा रोपे कार्बोनडेनिस आणि कार्गोसलाईनमध्ये प्रक्रिया करून बुडवून घ्यावे आणि त्यानंतर लागवड करावी त्यामुळे कांद्यावर पडणारी रोगराई कमी प्रमाणात होते, असेही काळे यांनी सांगितले.

डॉ. राजीव काळे
author img

By

Published : Oct 24, 2020, 3:52 PM IST

पुणे - खरीप हंगाम व लेट खरीप हंगामात कांद्याचे उत्पादन घेत असताना सुधारित जाती गादीवाफा व बीज प्रक्रिया आणि सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केल्यास नैसर्गिक आपत्ती व पावसाचे वाढते प्रमाण यामधून कांद्याचे कमी प्रमाणात नुकसान होऊन चांगले उत्पादन मिळण्यास मदत होईल, असा विश्वास कांदा लसूण संशोधन केंद्राचे संशोधक डॉक्टर राजीव काळे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

बीज प्रक्रिया आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरामुळे कांद्याचे उत्पादन वाढण्यास मदत

खरीप हंगामाच्या सुरुवातीला व खरिपाच्या हंगामात नैसर्गिक आपत्ती व पावसाचे प्रमाण वाढल्याने कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन वातावरणातील बदलामुळे रोगराई पसरते. परिणामी कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन कांदा उत्पादनातही घट होण्याची भीती आहे. या नुकसानीवर आळा घालण्यासाठी शेतकऱ्यांनी सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन डॉ. राजीव काळे यांनी केले आहे.

खरीप हंगामासाठी कांदा-लसूण केंद्राने कांद्याच्या सुधारित जाती विकसित केल्या आहेत. या कांद्याच्या जातींमध्ये भीमा सुपर, भीमा डार्क, रेड, भीमाराज या कांद्याच्या जातीचे जास्त पर्जन्यमानातही कमी नुकसान होते आणि या खरीप हंगामातील उपयुक्त जाती असून चांगले उत्पादन मिळते, असेही काळे यांनी सांगितले.

सध्याच्या नैसर्गिक आपत्ती काळात कांद्यावर रोगराई जास्त प्रमाणात पडत आहे. यामध्ये जांभळा करपा, काळा करपा यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे अशावेळी कांद्याला बुरशी लागण्याची शक्यता असते. यावर शेतकऱ्यांनी बियाणे टाकण्यापूर्वी बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर कांदा लागवडीवेळी कांदा रोपे कार्बोनडेनिस आणि कार्गोसलाईनमध्ये प्रक्रिया करून बुडवून घ्यावे आणि त्यानंतर लागवड करावी त्यामुळे कांद्यावर पडणारी रोगराई कमी प्रमाणात होते, असेही काळे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.